जैन पर्युषण पर्वाचा मिरवणुकीने समारोप

By Admin | Updated: September 6, 2016 23:05 IST2016-09-06T23:05:11+5:302016-09-06T23:05:23+5:30

सांगता : रत्नसेन सुरिश्वरजी यांचे मार्गदर्शन

Jain celebrated with festivities by festivities | जैन पर्युषण पर्वाचा मिरवणुकीने समारोप

जैन पर्युषण पर्वाचा मिरवणुकीने समारोप

नाशिक : येथील श्री चिंतामणी मूर्तीपूजक संघाच्या वतीने मंगळवारी सकाळी शहरातून जैन पर्युषण पर्वाची सांगता मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प. पू. रत्नसेन सुरिश्वरजी महाराज तथा प.पू. साध्वीजी भगवंत यांच्या मार्गदर्शनात संघातील सदस्यांनी उत्साहात सहभाग घेतला.
जैन समाजाच्या पर्युषण पर्वात अनेक समाजबांधवांनी प. पू. रत्नसेन सुरिश्वरजी महाराजसा तथा प.पू. साध्वीजी भगवंत यांच्या मार्गदर्शनात उपवास केले. यात एका जैन बांधवाने ३० दिवसांचा, पाच बांधवांनी १६, तर ४० समाजबांधवांनी ८ उपवास केले. तसेच विविध समाजबांधवांनी या तपश्चर्यात सहभाग नोंदवला. मंगळवारी या उपवास व तपश्चर्येच्या समारोपानिमित्त शहरातून प.पू. रत्नसेन सुरिश्वरजी महाराजसा तथा प. पू. साध्वीजी भगवंत यांची मिरवणूक काढण्यात आली. अश्वरथांसह काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अशोक शाह, प्रकाश बोथरा, भूपेंद्र शाह, प्रवीण शाह, सिल्केश शाह, शैलेश शाह, जसवंत शाह आदि पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Jain celebrated with festivities by festivities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.