शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जय शिवाजीच्या जयघोषाने दुमदुमले नाशिक शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 19:04 IST

नाशिक- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने अवघी नाशिक नगरी दुमदुमली आहे. ढोल ताशांच्या गजरात नाशिक शहरातील मुख्य सार्वजनिक मिरवणूकीसह उपनगरांमध्येही मिरवणूकांना सर्वात जल्लोषात मिरवणूका सुरू आहेत.

ठळक मुद्देसर्वत्र भगवा जल्लोष मिरवणूकांनी दुणावला उत्साह

नाशिक- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने अवघी नाशिक नगरी दुमदुमली आहे. ढोल ताशांच्या गजरात नाशिक शहरातील मुख्य सार्वजनिक मिरवणूकीसह उपनगरांमध्येही मिरवणूकांना सर्वात जल्लोषात मिरवणूका सुरू आहेत.

शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच शिवजयंतीचा जल्लोष सुरू आहे. विविध मंडळे आणि राजकिय पक्षांच्या वतीने भव्य देखावे उभारण्यात आले आहेत. या सर्वच ठिकाणी दिवसभर शिवरायांना अभिवादनाचे कार्यक्रम सुरू होते. अनेक मुला- मुलींनी शिवरायांचे वेशभूषा देखील केली होती. भगवेध्वज आणि शिवरायांची चित्रे असलेल्या मोटारी शहर भर धावत होत्या आणि जल्लोषही करीत होत्या. शहरातील प्रत्येक शासकिय कार्यालये, शिक्षण संस्था तसेच राजकिय पक्षांच्या वतीने देखील अभिवादन करण्यात आले.

नाशिक जिल्हयात आणि शहरातील उपनगरांमध्ये शिवजयंती मिरवणूका काढण्यात आल्या आहेत. नाशिक शहरातील मुख्य मिरवणूकीचा शुभारंभ महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्ताने सर्वच राजकिय पक्षांचे प्रमुख नेते आणि लोकप्रतिनिधींनी फेर धरल होता. ढोल ताशाच्या निनादात आणि गुलालाची उधळण करीत या मिरवणूका सुरू असून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दरम्यान, सातपुर येथिल सावरकर नगर येथे शिवरायांचे महानाट्य सायंकाळी सादर होणार असून याच परिसरात शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका