जय हो तुम्हारी बालाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST2021-07-27T04:15:58+5:302021-07-27T04:15:58+5:30

नाशिक महापालिकेत सध्या प्रभाग समितीतील फाटाफुटीचे प्रकरण गाजतेय. या निवडणुकीत गैरहजर एक सदस्य म्हणे नाशकात उपस्थित नव्हता. मुंबईस कामासाठी ...

Jai ho tumhari balaji! | जय हो तुम्हारी बालाजी!

जय हो तुम्हारी बालाजी!

नाशिक महापालिकेत सध्या प्रभाग समितीतील फाटाफुटीचे प्रकरण गाजतेय. या निवडणुकीत गैरहजर एक सदस्य म्हणे नाशकात उपस्थित नव्हता. मुंबईस कामासाठी गेल्याचे सांगितले गेले. वास्तविक निवडणूक ऑनलाईन होती. त्यामुळे सभागृहात येण्याचा प्रश्नच नव्हता. मुंबईतूनही मोबाईलवर लिंकवर क्लिक करून ऑनलाईन हजेरी लावता आली असती परंतु मुंबईत अडकलो ही लोणकढी थाप पटकन बसली. खरा किस्सा पुढेच आहे. या नगरसेवकाचा कारभारच इतका ‘विशाल’ की, प्रत्येक निवडणुकीत त्याला नाशिक सोडूनच दूर जावे लागते. त्यामुळे दरवेळी त्याला व्हीप बजावायचे हे दिव्यच असते. आताही तोच प्रकार घडला. असा अहवालही म्हणे पक्षश्रेष्ठींकडे गेला आहे. आता या विशाल कारभाऱ्याला पक्षशिस्त भंगाच्या कारवाईतून कसे वाचवायचे असा प्रश्न त्याच्या गॉडफादरलाही पडला आहे.

Web Title: Jai ho tumhari balaji!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.