‘जय भीम’चा जयघोष

By Admin | Updated: April 15, 2017 01:21 IST2017-04-15T01:21:30+5:302017-04-15T01:21:50+5:30

आंबेडकर जयंती मिरवणूक : चलतचित्रांनी वेधले लक्ष

Jai Bhim's hail | ‘जय भीम’चा जयघोष

‘जय भीम’चा जयघोष

आंबेडकर जयंती मिरवणूक : चलतचित्रांनी वेधले लक्ष‘जय भीम’चा जयघोषनाशिक : ‘बोलो बोलो जय भीम’ च्या जयघोषात आणि ढोलताशाच्या गजरात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली आली. त्यानिमित्ताने सहभागी चित्ररथांच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याला उजाळा देण्यात आला.
शहरात प्रबोधन फेरी, सामुदायिक बुद्धवंदना, अभिवादन सभा, सलग अठरा तास अभ्यास, दुचाकी रॅली, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, आरोग्य शिबिर आणि भव्य मिरवणूक अशा विविध उपक्रमांनी शुक्रवारी (दि.१४) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसभर भीमगीतांचा सर्वत्र गजर सुरू होता. सायंकाळी शहरातील विविध मंडळांसह राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून निघालेल्या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी ‘जय भीम’चा जयघोष केला. प्रमुख रस्ते, चौकात लावलेल्या शेकडो झेंड्यांमुळे निळेमय झालेल्या वातावरणात सायंकाळी मोठ्या राजवाड्यातून महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली. याप्रसंगी आमदार जयंत जाधव, उपमहापौर प्रथमेश गिते, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, महंत भक्तचरणदास, फादर डिसूजा आदी उपस्थित होते.

Web Title: Jai Bhim's hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.