जय भवानी जय शिवाजीचा जयघोष

By Admin | Updated: March 10, 2015 23:52 IST2015-03-10T23:52:25+5:302015-03-10T23:52:47+5:30

शिवजयंती : शहर परिसरात विविध कार्यक्रम

Jai Bhavani Jay Shivaji's Glory | जय भवानी जय शिवाजीचा जयघोष

जय भवानी जय शिवाजीचा जयघोष

नाशिक : शहर व परिसरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. जय भवानी जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. विविध ठिकाणी सुरु असलेल्या पोवाड्यांनी वातावरणात वीरश्री संचारली होती.
आडगाव
मारुती मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन जयंत दिंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळापूजन निवृत्ती मते, मधुकर मते, मल्हारी मते, बबनराव माळोदे यांनी केले. यावेळी सुरेश मते, संजय शिंदे, सुनील जाधव, जालिंदर शिंदे, कैलास माळोदे, बालाजी माळोदे, दत्तू शिंदे, अरुण मते, किरण लभडे, गोकुळ शिंदे, सुदाम दुशिंग, संदीप पोटे, पोपट लभडे, अभय माळोदे, रामभाऊ जाधव, प्रवीण हांडोरे, देवा कडभाने, विनोद हिंदे, बंडू लभडे, सोनू मते, प्रकाश मते, वैभव मते, ज्ञानेश्वर लोहकरे आदी उपस्थित होते. प्रा जावेद शेख यांचे व्याख्यान झाले. सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. सूत्रसंचालन अभय माळोदे यांनी केले. आभार निवृत्ती मते यांनी मानले.
सिडको
राजरत्ननगर येथील श्री गुुरुदत्त मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष मनोज हिरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच महिला दिनाचे औचित्य साधून परिसरातील घरसांभाळून काम करणाऱ्या कष्टकरी महिलांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन बबन गडाख यांनी केले, तर रंधे यांनी आभार मानले. नीलेश ठाकरे, रेखा लिंगायत, मनीषा हिरे, सुभाष बोरसे, रमेश सौंदाणे, दीपक खैरनार आदिंनी कार्र्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
उपनगर
उपनगर, गांधीनगर, आगर टाकळी परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच आगर टाकळी परिसरासह शिवाजीनगर, आंबेडकरनगर, गांधीनगर, उपनगर भागातील विविध लहान-मोठ्या कॉलनींमध्ये भगवे ध्वज, पताका लावून भगवेमय वातावरण करण्यात आले होते. परिसरातील अनेक मित्रमंडळांनी छत्रपती शिवरायांचे भव्य कटाउट्स उभारून आकर्षक सजावटी बरोबरच नेत्रदीपक रोषणाईदेखील केली होती. रात्री बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी करीत प्रतिमापूजन करण्यात आले. विविध मंंडळांच्या वतीने शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी झालेल्या जयंती उत्सवात पूर्व प्रभाग सभापती प्रा. कुणाल वाघ, नगरसेवक राहुल दिवे, मेघा साळवे, सुमनताई ओहोळ, रवि पगारे, विजय ओहोळ, अनिल ताजनपुरे, नीलेश चहाणे आदिंसह अनेकांनी प्रतिमापूजन केले.

Web Title: Jai Bhavani Jay Shivaji's Glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.