जगदंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण
By Admin | Updated: October 11, 2015 22:03 IST2015-10-11T22:02:32+5:302015-10-11T22:03:24+5:30
जगदंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

जगदंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण
वणी : जगदंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, येत्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी वणीकर सज्ज झाले आहेत.
निवासासाठी भक्तनिवास, धर्मशाळा, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, स्नानासाठी सुविधा, आरोग्यसुविधा वाहनतळ तसेच नऊ दिवस नवसफेडीसाठी घटी बसणाऱ्या महिलावर्गासाठी विशेष सुशोभित मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसर स्वच्छता सुशोभिकरण, मंदिरांना रंगकाम याबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे पंचामृत महाअभिषेक विशेष पूजा, आरती, दुपारी मध्यान्ह आरती, सायंकाळी विशेष आरती असे नियोजन करण्यात आले आहे.
घटस्थापनेपासून सायंकाळी देवीचा पितळी मुखवटा सुशोभित पालखीत ठेवून गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात येते.
देवीला नऊवार पातळ,
एक मीटरची चोळी, कानात
कर्णफुले, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्रासह सुवर्ण अलंकार, डोक्यावर चांदीची छत्री, शिरावर मुकूट, कसात फूट असलेल्या जगदंबेचा या नऊ दिवसांत साज शृंगार करण्यात येतो.
पुष्परचना, रंगीत रांगोळी, कपाळावर वेगवेगळे सौभाग्यलेणे नवरात्रोत्सव काळात प्रत्येक दिवशी नऊ रंगाच्या साड्या व खणाद्वारे जगदंबेची सजावट करण्यात येते. (वार्ताहर)
यात्रोत्सव सुरळीत पाडण्यासाठी गृहरक्षक दलाचे जवान, महिला व पुरुष पोलीस कर्मचारी जगदंबा ग्रुपचे कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था याबरोबर सुरक्षिततेसाठी बारा सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. थोरात-देशमुख यांच्याबरोबर गावातील समाजातर्फे जगदंबेचे प्रतिनिधिक पूजन करण्यात येते. (वार्ताहर)