जगतधात्री पूजा उत्सव सोहळा
By Admin | Updated: November 9, 2016 00:49 IST2016-11-09T00:52:33+5:302016-11-09T00:49:07+5:30
बंगाली बांधव : गांधीनगर वेल्फेअर क्लबचा उपक्रम

जगतधात्री पूजा उत्सव सोहळा
उपनगर : गांधीनगर येथील वेल्फेअर क्लबच्या मैदानावर बंगाली बांधवांच्या जगतधात्री पूजा उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. कोलकाता येथील चंदननगर भागात ३७० वर्षापासून श्रीश्री जगतधात्री मातेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नाशिकमध्येही गेल्या ९ वर्षापासून गांधीनगर येथील बंगाली बांधवांच्या वतीने या उत्सवास प्रारंभ करण्यात आला असून, रविवारपासून प्रारंभ झालेला श्रीश्री जगत्धात्री मातेचा उत्सव गुरुवारपर्यंत चालणार असून उत्सवानिमित्त आबोधन पुष्पांजली, संधीपूजा, सिंदूर उत्सव, अपराजिता, दर्पण बिसर्जन, भोग आदि धार्मिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमदेखील पार पडणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकर डे, अशोक सरकार, बिपलॉ सोहम, दुर्गाचरण डे, सुब्रतो मुखर्जी, महादेव देबनाथ, हिरक बिश्वास, निवेदिता पॉल, मीनाक्षी मंडल आदि बंगाली बांधव प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)