पंढरपूरच्या वारीमध्ये ‘बेटी बचाव’चा जागर
By Admin | Updated: July 28, 2015 22:39 IST2015-07-28T22:39:12+5:302015-07-28T22:39:39+5:30
पंढरपूरच्या वारीमध्ये ‘बेटी बचाव’चा जागर

पंढरपूरच्या वारीमध्ये ‘बेटी बचाव’चा जागर
नाशिक : पंढरपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या नारी विकास केंद्राच्या वतीने ‘बेटी बचाव’चा जागर करण्यात आला. अंतरुना येथे तुकाराम महाराजांच्या दिंंडीच्या वेळी मुक्कामी दहा मुलींनी जोगवा सादर केला. संयोजक व्ही. एन. दिनकर यांनी स्त्रीभ्रूणहत्त्या थांबविण्यासाठी संविधानिक मूल्य स्त्री-पुरुष समानता, स्त्री स्वांतत्र्य समाजात प्रामाणिकपणा यांचा संदेश दिला. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भारणे यांच्या हस्ते कलापथकाचा सत्कार करण्यात आला. नांदेड, सोलापूर येथील दिंड्यांमध्येही बालविवाह, हुंडा पद्धत, कौटुंबिक हिंंसाचार या विषयांवर कलापथकाने प्रबोधन केले.
रासबिहारी शाळा
रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्ताने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे अभंग व भजन, प्रार्थना सभागृहात गावून विठ्ठलाप्रती आपली भावना प्रकट केली. ‘विठ्ठल रखूमाई जय जय...’ हा अभंग विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक दसककर यांच्यासोबत आवडीने गायला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात अभंगाने अवघी शाळा विठू नामाने दुमदुमली.
सारडा कन्या शाळा
ना. ए. सोसायटीच्या मातोश्री रामप्यारीबाई कन्या शाळेत आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थिनींनी संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषा करून शालेय परिसरातून दिंडी काढली. यावेळी दिंडीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अबोली अकोलकर, स्वाती काळे, लतिका पाटील, सुनंदा जगताप तसेच साक्षी चुंबळे, स्तुती शिंदे, प्रिया जाधव आदि उपस्थित होते.