उंबरठाण महाविद्यालयास जगन्नाथ राठी पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:57 IST2020-02-12T21:37:31+5:302020-02-12T23:57:30+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत दिला जाणारा जगन्नाथ राठी पुरस्कार तालुक्यातील उंबरठाण महाविद्यालयास मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनाप्रसंगी जगन्नाथ राठी पुरस्कार सुप्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते स्वीकारताना हेमलता बीडकर. समवेत पुणे विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमळकर व मान्यवर.
सुरगाणा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत दिला जाणारा जगन्नाथ राठी पुरस्कार तालुक्यातील उंबरठाण महाविद्यालयास मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
वर्धापनदिनानिमित्त पुणे विद्यापीठ जीवनसाधना गौरव पुरस्कार, युवा गौरव पुरस्कार व इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामकाज करणाऱ्या संस्थांचा गौरव करीत असते. वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी मराठी संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हेमलता बीडकर यांनी पुरस्कार स्वीकारला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व दहा हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी उंबरठाण महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एकनाथ आहेर, मुल्हेर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. डी. ए. सोनवणे, कार्यक्रम समन्वयक प्रा. देशमुख उमा उपस्थित होते.