जगनाडे महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:41 IST2020-12-11T04:41:40+5:302020-12-11T04:41:40+5:30

सिडको : येथील तेली समाज संचलित श्रीसंत जगनाडे महाराज सेवा मंडळ, संताजी युवक मंडळ, सर्वांगिणी महिला मंडळ यांच्या संयुक्त ...

Jagannade Maharaj | जगनाडे महाराज

जगनाडे महाराज

सिडको : येथील तेली समाज संचलित श्रीसंत जगनाडे महाराज सेवा मंडळ, संताजी युवक मंडळ, सर्वांगिणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे बी. जी. चौधरी व विठ्ठलराव शेलार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संताजी मंडळाचे राजेंद्र गवळी, शिवाजीराव चौधरी, रमेश चौधरी, योगेश चौधरी, मनीषा मोरे, उपस्थित होते. कुमारी अनन्या कस्तुरे (वय ८) हिने संताजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाशझोत टाकला. तर, विनायक सोनवणे यांनी श्री संताजी महाराज यांचा जीवनपट उलगडून सांगितला. यावेळी विनायक सोनवणे, नामदेवराव चौधरी, वसंतराव चौधरी, अर्जुन वेताळ, योगेश चौधरी आदी उपस्थित होते. (फोटो ०९ संताजी)

---------

Web Title: Jagannade Maharaj