इगतपुरीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी जाधव
By Admin | Updated: November 11, 2015 22:04 IST2015-11-11T22:03:43+5:302015-11-11T22:04:25+5:30
इगतपुरीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी जाधव

इगतपुरीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी जाधव
इगतपुरी : इगतपुरी नगर परिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी शिवसेना-रिपाइंच्या रत्नमाला जाधव यांची मंगळवारी निवड करण्यात आली आहे.
नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्ष जनाबाई खातळे या दोन महिने रजेवर गेल्यामुळे सदर नगराध्यक्ष पदाचा कार्यभार रत्नमाला जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. इगतपुरी नगर परिषदेच्या सभागृहात आज शिवसेना व रिपाइंच्या नगरसेवकांची विशेष बैठक घेण्यात आली. त्यात उपनगराध्यक्ष रत्नमाला जाधव यांची दोन महिन्याकरता नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर, रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता, नगरसेवक सुनील रोकडे, शशी उबाळे, ज्ञानेश शिरोळे, सतीश कर्पे, नगरसेविका संगीता वारघडे, अलका चौधरी, रुक्मिणी डावखर, नीलिमा सोनवणे, विजय जाधव, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, भगूरचे नगरसेवक आर.डी.साळवे, सतीश गरुड, जयेश गरुड, रिपाइं युवा शहराध्यक्ष संदीप जगताप, युवा कार्याध्यक्ष जितू दोंदे ,अनिल दोंदे , अरुण जाधव आदि उपस्थित होते. निवड झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना
पुष्पहार अर्पण करण्यात आले. (वार्ताहर)