जिल्हा बॅँक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी जाधव

By Admin | Updated: January 25, 2016 00:10 IST2016-01-24T23:24:19+5:302016-01-25T00:10:07+5:30

जिल्हा बॅँक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी जाधव

Jadhav is the President of District Bank Employees Association | जिल्हा बॅँक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी जाधव

जिल्हा बॅँक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी जाधव

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी रतन जाधव यांची निवड करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष प्रभाकर डगे यांची बॅँकेच्या व्यवस्थापकपदी निवड झाल्यामुळे ही निवड
झाली.
तसेच कार्यकारिणीतील इतर सदस्यांचे सेवानिवृत्ती व इतर कारणांमुळे बदल होऊन त्यात सर्वानुमते प्रदीप दादाजी शेवाळे यांची सरचिटणीस, सुभाष गडाख यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणीत जुन्यांबरोबरच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यावेळी प्रभाकर ढगे म्हणाले की, जिल्हा बॅँक अधिक सक्षम होण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांना चांगली सेवा द्यावी. शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्जपुरवठा करावा आणि कर्ज वसुली जास्तीत जास्त करून थकबाकीचे व एनपीएचे प्रमाण कमी करावे, असे आवाहन केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जोरण येथे जि. प. अध्यक्ष चषक स्पर्धा
जोरण : येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक बीटस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन वीरगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जोरण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वैयक्तिक नृत्य प्रकारातील लहान गटात जोरण शाळेची विद्यार्थिनी प्राची सावकार हिने प्रथम क्रमांक मिळविला.
यावेळी स् सटाण्याचे नगरसेवक मनोज सोनवणे, जोरणचे उपसरपंच सुभाष सावकार, विस्तार अधिकारी सुर्यवंश्ी, केंद्रप्रमूख धोंडगेआदी उपस्थित हाते .

Web Title: Jadhav is the President of District Bank Employees Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.