जाधव खुनातील संशयितांना कोठडी
By Admin | Updated: July 28, 2014 00:55 IST2014-07-27T00:46:33+5:302014-07-28T00:55:19+5:30
जाधव खुनातील संशयितांना कोठडी

जाधव खुनातील संशयितांना कोठडी
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून सिडकोतील सागर जाधव याचा धारदार शस्त्राने वार करून खून करणारे संशयित अशोक नागरे, मंदा नागरे, संजय नागरे, विजय नागरे, राजू नागरे व नाना सानप यांना न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सागर दत्तू जाधव (२२) हा युवक कामावरून घरी जात होता़ त्यावेळी पंडितनगर येथे संशयित नागरे कुटुंबीयांनी सागरला रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केल्याने सागरचा मृत्यू झाला़ याप्रकरणी अंबड पोलिसांनी नागरे कुटुंबातील सहा संशयितांना अटक केली होती़ या सर्वांना न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़