मजदूर संघाच्या अध्यक्षपदी जे. आर. भोसले

By Admin | Updated: March 15, 2015 00:44 IST2015-03-15T00:44:14+5:302015-03-15T00:44:14+5:30

मजदूर संघाच्या अध्यक्षपदी जे. आर. भोसले

J. The President of the Labor Party R. Bhosale | मजदूर संघाच्या अध्यक्षपदी जे. आर. भोसले

मजदूर संघाच्या अध्यक्षपदी जे. आर. भोसले

नाशिकरोड : भारत प्रतिभुती व चलार्थ पत्र मुद्रणालयातील मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत शनिवारी सुमारे ९५ टक्के मतदान झाले. उद्या रविवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. मजदूर संघाच्या अध्यक्षपदी मुंबईतील कामगार नेते जे. आर. भोसले यांची संघाच्या प्रथेप्रमाणे यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. कार्याध्यक्ष-१, जनरल सेक्रेटरी-१, खजिनदार-१, उपाध्यक्ष- ४, जॉइंट सेक्रेटरी-६ व कार्यकारिणी सदस्य- १६ अशा एकूण २९ जागांसाठी आपला व कामगार पॅनलने आपले उमेदवार उभे केले होते. दोन्ही पॅनल व उमेदवारांकडून सर्व पातळीवर प्रचार करून जोर लावण्यात आल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
भारत प्रतिभुतीमध्ये २२४० व चलार्थ मुद्रणालयात २१४४ असे एकूण ४३८४ मतदान आहे. दोन्ही मुद्रणालयात वर्कशॉप, कंट्रोल व टेक्निकल विभागात एकूण सहा ठिकाणी मतदान केंदे्र होती. उद्या रविवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. दोन्ही पॅनलकडून विजयाचा दावा करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माधवराव भणगे काम पाहत आहे.

Web Title: J. The President of the Labor Party R. Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.