आयटीआय आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया उद्यापासून
By Admin | Updated: July 4, 2014 00:23 IST2014-07-04T00:09:51+5:302014-07-04T00:23:20+5:30
आयटीआय आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया उद्यापासून

आयटीआय आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया उद्यापासून
सातपूर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेशप्रक्रिया ५ जुलैपासून आॅनलाइन घेण्यात येणार आहे. सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्र्रशिक्षण संस्थेत यावर्षी विविध ३२ व्यवसाय अभ्यासक्रमांतील ६० तुकड्यांसाठी ११९० विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. यावर्षीदेखील आॅनलाइन पद्धतीनेच प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रवेशप्रक्रिया, अभ्यासक्रमांची माहिती, नियम, निकष यांचीही माहिती प्रवेशार्थी विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी तेथेच माहिती घ्यावी. ५ जुलैपासून प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
दरम्यान, मागील वर्षापासून आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र मागील वर्षी प्रवेशप्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर्षी असे होऊ नये म्हणून अगोदरपासूनच काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)