शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपुस्तकावर राहणार ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST

नाशिक : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांसह अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शिक्षण संस्थांच्या स्वयंअर्थ साहाय्य प्राथमिक शाळांमध्ये या ...

नाशिक : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांसह अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शिक्षण संस्थांच्या स्वयंअर्थ साहाय्य प्राथमिक शाळांमध्ये या वर्षी पहिली ते चौथीपर्यंतच्या एकाही वर्गाची परीक्षा होऊ शकलेली नाही. कोविड १९ च्या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार वर्गोन्नतीबाबत मार्गदर्शक सूचना असलेला शासनाचा निर्णय जाहीर झाला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये ज्या विद्यार्थ्याचे आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत गुणदान करताना नियमित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा. तसेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शिक्षकांनी विविध सधन तंत्रांचा वापर करून ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत केवळ आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्यांची संपादणूक लक्षात घेता त्याचे रूपांतर १०० गुणांमध्ये करावे व त्यानुसार विद्यार्थ्यांची श्रेणी निर्धारित करण्यात यावी, अशा सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. कोणत्याही कारणास्तव ज्या विद्यार्थ्याचे आकारिक, संकलित मूल्यमापन करणे शक्य झालेले नाही अशा विद्यार्थ्याच्या बाबतीत शासनाने सूचित केल्यानुसार बालकाचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १६ नुसार पुढील वर्गात वर्गाेन्नत करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या प्रगतिपुस्तकावर ‘आर.टी.ई. ॲक्ट २००९ कलम १६ नुसार ‘वर्गोन्नत’ असा शेरा नमूद करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. त्यामुळे या वर्षी पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतिपुस्तकावर ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख राहणार आहे.

---

पॉइंटर्स

पहिलीतील विद्यार्थी -१,१७,०४५

दुसरीतील विद्यार्थी - १,२१,३४२

तिसरीतील विद्यार्थी -१,२०,६१८

चौथीतील विद्यार्थी - १,२३,९३९

--

इन्फो

प्रगतिपुस्तकच बदलणार

कोरोनामुळे गेल्या वर्षी शाळा आणि परीक्षाही होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे राज्य शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी तसेच बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार गुणदान करून पुढील वर्गात प्रवेशित केले जाणार असल्याने या वर्षी विद्यार्थ्यांचे प्रगतिपुस्तकच पूर्णपणे बदलणार आहे. गुणपत्रकावर विद्यार्थ्यांना श्रेणीऐवजी ‘वर्गोन्नत’ असा शेरा दिला जाणार आहे. ज्या पद्धतीने शिक्षकांनी गुणदान केले आहे त्याच प्रमाणे प्रगतिपत्र राहणार असले तरी सर्व प्रगतिपत्रांवर ‘वर्गोन्नत’चा शेरा मात्र सारखाच असणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

---

शिक्षणाधिकाऱ्याचा कोट

शासननिर्णयानुसार विद्यार्थ्यांना संकलित अथवा आकारिक पद्धतीने गुणदान करून विद्यार्थ्यांचे प्रगतिपुस्तक तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या पद्धतीने शक्य नसेल तर शासन निर्णयाप्रमाणे अन्य पाच पर्यायांचा विचार करून शिक्षक गुणदान करू शकणार आहेत. या प्रगतिपुस्तकावर ‘वर्गोन्नत’ असा शेरा असणार आहे. ही प्रगतिपुस्तके शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना ऑनलाइन पद्धतीने पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

- राजीव म्हसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, नाशिक

--

मुले घरात कंटाळली

शाळा सुरू नाही, परीक्षाही होत नाहीत. त्यामुळे पास झालो की नापास तेही कळत नाही. शिक्षक आणि घरचे सांगतात या वर्षी पाचवीत जायचे आहे. पण, अजून निकालच लागला नाही. घरून ऑनलाइन शिक्षणाचा आता कंटाळा आला आहे. शाळा कधी सुरू होणार याची प्रतीक्षा आहे.

- वेदांग लांडगे, चौथीतील विद्यार्थी

--

घरून ऑनलाइन शिक्षण घेताना शिक्षकांनी सांगितलेला गृहपाठ आई-बाबांच्या मदतीने पूर्ण होत असला तरी खेळायला मिळत नाही. शाळेत मित्रांसोबत अभ्यास करताना धम्माल-मस्ती करायला मिळते. त्यामुळे आता शाळा सुरू व्हायला हव्यात.

- योग्यता पवार, तिसरीतील, विद्यार्थिनी

--

शाळेत शिक्षक गाणी-गोष्टी सांगून वेगळ्या खेळण्यांसोबत अभ्यास घेतात, पण गेल्या वर्षात एकदाही शाळेत जाऊन खेळता आले नाही. घरी कोणी मित्रही नाही. घरी मोबाइलवरून अभ्यास करताना कंटाळा येतो. त्यामुळे आता शाळा सुरू झाल्या पाहिजेत.

- ओमकार ढेरिंगे, चौथीतील विद्यार्थी