शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

काम करत नाही म्हणून जन्मदाताच उठला मुलीच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 23:59 IST

दिंडोरी : तालुक्यातील देहरेवाडी शिवारातील जंगलात शुक्रवारी (दि. ७) दहावर्षीय मुलीला फासावर लटकविण्याचा प्रयत्न गुराख्यांच्या सतर्कतेमुळे फसला होता. या घटनेचे गूढ वाढले असतानाच, जन्मदाता पिताच आपल्या मुलीच्या जिवावर उठल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दिंडोरी पोलिसांनी अवघ्या बारा तासांत या गुन्ह्याचा छडा लावत मुलीचा पिता रामू धनगरे (रा. मुंगसरे, ता. नाशिक) यास बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देबारा तासांत छडा : देहरेवाडीच्या जंगलात गळफास देण्याचा प्रयत्न

दिंडोरी : तालुक्यातील देहरेवाडी शिवारातील जंगलात शुक्रवारी (दि. ७) दहावर्षीय मुलीला फासावर लटकविण्याचा प्रयत्न गुराख्यांच्या सतर्कतेमुळे फसला होता. या घटनेचे गूढ वाढले असतानाच, जन्मदाता पिताच आपल्या मुलीच्या जिवावर उठल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दिंडोरी पोलिसांनी अवघ्या बारा तासांत या गुन्ह्याचा छडा लावत मुलीचा पिता रामू धनगरे (रा. मुंगसरे, ता. नाशिक) यास बेड्या ठोकल्या.  मुलगी काम करत नाही, नेहमी भांडण करते, शिव्या देते, या कारणावरून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची बाब तपासात पुढे आली आहे.शुक्रवारी (दि. ७) दुपारी १२ च्यासुमारास देहरेवाडी जंगलात एका दहावर्षीय मुलीस एकजण झाडाला लटकवून गळफास देत असल्याची घटना उघडकीस आली होती. परिसरातील गुराख्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. त्यानंतर दिंडोरी पोलिसांनी या मुलीस उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, या मुलीला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने या घटनेचे गूढ वाढले होते. याप्रकरणी जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील व पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहायक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे यांनी तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान, मुंगसरे येथील रामू धनगरे याने गावातील व्हॉट्स-ॲप ग्रुपवर मुलीचा फोटो व बातमी आल्याचे समजताच पोलीस ठाण्यात तसेच नाशिक जिल्हा रुग्णालयात येत ही मुलगी आपलीच असल्याचे सांगितले. तिला कुणीतरी पळवून नेत मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद देखील दिली. मात्र तपासात मुलीच्या पित्यानेच हे कृत्य केले असावे, असा संशय पोलिसांना आला. त्यांनी त्यास गाफील ठेवत तपास सुरू केला. दरम्यान, शनिवारी (दि. ८) सकाळी मुलगी शुध्दीवर आली व तिने आपल्या वडिलानेच मोटारसायकलवरून दरीकडील जंगलाकडे नेत तेथे मारहाण केली व दोरीने गळा आवळला. त्यानंतर आपण बेशुद्ध झाल्याचा जबाब दिला. पोलिसांनीही रामूस पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दिंडोरी पोलीस ठाण्यात वडील रामू धनगरे याच्याविरुध्द मुलीला मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीच्याच हाती पडल्या बेड्याप्रतीक्षा ही रोज भांडण करते, कामाला जात नाही, मोठ्या बहिणीबरोबर वाद घालते, तसेच मलाही शिव्या देत असल्याचा राग येऊन जंगलात नेऊन तिला फासावर लटकविण्याचा प्रयत्न केल्याचे संशयित रामू धनगरे याने कबूल केले. रामू हा मूळचा ओझरखेड, ता. त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी असून, सध्या मजुरीसाठी मुंगसरे येथे भाड्याने खोली घेऊन राहत होता. त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती. मात्र, त्याची तीन मुले व रामू दुसरी महिला व तिच्या दोन मुलांसमवेत राहत होता. त्याचा मुलीला मारण्याचा प्रयत्न फसल्यानंतर त्याने नंतर अज्ञात इसमाने तिला पळवून नेल्याची फिर्याद दिली; परंतु पोलिसांनी खाक्या दाखविल्यानंतर फिर्यादीच आरोपी निघाला.

टॅग्स :dindori-acदिंडोरीCrime Newsगुन्हेगारी