संघर्षच जीवनाला आकार देतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 00:53 IST2020-02-10T00:25:05+5:302020-02-10T00:53:37+5:30
जीवनात संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनच मी माझ्या जीवनाची वाटचाल केली आहे. म्हणून संघर्षच जीवनाला आकार देतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गव्हाणे यांनी केले.

लक्ष्मण गव्हाणे यांच्या जीवन मंथन पुस्तकाचे प्रकाशन करताना साहित्यिक विजयकुमार मिठे, पुंजाजी मालुंजकर, भाऊसाहेब खातळे, अनिल घनवट, अरुण भार्गवे, सीमा नरोडे, आंधळे, देवरे, लक्ष्मण गव्हाणे आदी.
वाडीवºहे : जीवनात संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनच मी माझ्या जीवनाची वाटचाल केली आहे. म्हणून संघर्षच जीवनाला आकार देतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गव्हाणे यांनी केले.
इगतपुरी तालुका साहित्य मंडळातर्फे त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. यावेळी ‘जीवनमंथन’ या त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
इगतपुरी तालुका साहित्य मंडळाने लक्ष्मण गव्हाणे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने कांचनगाव येथे जीवनगौरव पुरस्कार, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला.
दीपप्रज्वलनाने कार्यक्र मास सुरुवात झाली. साहित्य मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भाऊसाहेब खातळे, अनिल घनवट, सीमा नरोडे, अरुण भार्गवे, सुधीर काटकर, आंधळे पाटील, देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. विजयकुमार मिठे यांनी आपल्या दोन कविता सादर करून कार्यक्रमास रंगत आणली. बाळासाहेब पलटणे यांनी सूत्रसंचालन केले. विजयकुमार कर्डक यांनी आभार मानले.
कार्यक्रमास बाळकृष्ण नाठे, दत्तात्रय झनकर, घोडेकर, बाळासाहेब धुमाळ, किसन शिंदे, हेमंत साळी, गोपाळ शिंदे, तसेच शेतकरी संघटना, ग्राहक पंचायत कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.