शिक्षणाचे आधुनिक तंत्र आत्मसात करणे आवश्यक

By Admin | Updated: September 6, 2016 01:32 IST2016-09-06T01:32:00+5:302016-09-06T01:32:41+5:30

शिक्षक दिन : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या चर्चासत्रातील सूर

It is necessary to acquire modern techniques of learning | शिक्षणाचे आधुनिक तंत्र आत्मसात करणे आवश्यक

शिक्षणाचे आधुनिक तंत्र आत्मसात करणे आवश्यक

नाशिक : आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात स्पर्धात्मक शिक्षणाच्या विविध आधुनिक पद्धती विकसित होत असताना खासगी क्लासच्या शिक्षकांनी शिक्षणाचे आधुनिक तंत्र आत्मसात करण्याची गरज असल्याचा सूर ‘खासगी क्लासेस काल, आज आणि उद्या’ चर्चासत्रात उमटला.
नाशिक प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनतर्फे शिक्षक दिनानिमित्त येथील गुरूकृपा क्लासेस येथील राज्यस्तरीय चर्चासत्र जयंत मुळे यांच्या अध्यक्षतेत पार पडले. प्रमुख पाहुणे चंद्रशेखर बेहरे, रफिक शेख, ज्ञानेश्वर काष्टे, वाल्मीक सानप, सुनील रुणवाल आदिंनी शिक्षक व संचालकांनी त्यांच्या अडचणी व समस्यांवर यावेळी चर्चा केली. या चर्चासत्रात प्रा. सुरेश साळुंके, शिवाजी कांडेकर, यशवंत बोरसे, जगदीश देवरे आदि शिक्षक व संचालकांनी सहभाग घेतला. खासगी क्लासेसचालकांच्या समस्या आणि उपाययोजनांवर चर्चेदरम्यान क्लासचालकांनीही संख्यात्मक वाढ न करता गुणात्मक वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचा विचार यावेळी समोर आला. आजपर्यंत सुरू असलेल्या खासगी क्लासेसच्या पद्धती आता हद्दपार होत आहेत. त्यात शिकवण्याची पद्धतही बदलत असून, शाळा, महाविद्यालये ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना विविध सोयी-सुविधांसोबत विशेष सवलतीही देतात. सूत्रसंचालन अशोक देशपांडे यांनी केले, तर कैलास देसले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: It is necessary to acquire modern techniques of learning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.