कानाखाली आवाज काढायला मंत्रिपदाची पर्वा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST2021-07-17T04:13:10+5:302021-07-17T04:13:10+5:30
पंचवटीतील संजीवनी बँक्वेट हॉल येथे शुक्रवारी (दि. १६) प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री कडू बोलत ...

कानाखाली आवाज काढायला मंत्रिपदाची पर्वा नाही
पंचवटीतील संजीवनी बँक्वेट हॉल येथे शुक्रवारी (दि. १६) प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री कडू बोलत होते. नाशकात अपंगाचे काम करत नसल्याने एका अधिकाऱ्याशी वाद झाला व त्यातून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि पकड वॉरंट निघाले. नाशिकमध्ये येऊन सर्वसामान्य कार्यकर्ते तसेच अपंग शेतकरी बांधवांशी भेट झाली व त्यांचे प्रश्न समजू शकल्याचेही ते म्हणाले. संकुचित विचार करणारे कार्यकर्ते ज्या पक्षात असतात ते कोणत्याही पक्षात टिकत नाही, कोणतीही अशा अपेक्षा स्वार्थ न ठेवता जो कार्य करतो तोच खरा कार्यकर्ता असतो. आगामी तारखेला न्यायालयात जामीन मिळाल्यानंतर नाशिकला पुन्हा येऊन फक्त अपंग बांधवांना वेळ देऊन त्यांचा पहिला जनता दरबार नाशिकला घेणार असल्याचे कडू शेवटी म्हणाले. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, प्रहार जनशक्ती जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके, शरद शिंदे, ललित पवार आदी उपस्थित होते.
इन्फो बॉक्स==
कोरोना नियम पायदळी
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा राज्यमंत्री नामदार बच्चू कडू मंत्री झाल्यावर नाशिकला आले. त्यावेळी कार्यक्रमस्थळी शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने कोरोना नियम पायदळी तुडविले गेले. कार्यक्रमात फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा विसर कार्यकर्त्यांना तर पडलाच शिवाय व्यासपीठावर उपस्थित असलेले कडू व पदाधिकाऱ्यांनीदेखील मास्क लावून फिजिकल डिस्टन्सिंग पाळले नाही. कडू यांच्या स्वागतासाठी व्यासपीठावर उपस्थित प्रचंड गर्दी केल्याने त्या
गर्दीत काही काळ कडू दिसेनासे झाले होते.
बॉक्स==
कार्यकर्त्यांची अरेरावी
प्रहार पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. कडू यांचे भाषण सुरू झाल्यावर काही उपस्थित कार्यकर्ते मोबाईलमध्ये
फोटो काढण्यासाठी उभे राहिले असता देवळा तालुक्यातून आलेल्या काही चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी उर्मट भाषा वापरून पक्षाच्याच कार्यकर्त्यांवर अरेरावी केल्याने उपस्थित कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करून नाराजी दर्शविली.
(फोटो १६ कडू)