शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

पाणी पळवापळवीचा मुद्दा ‘भाजपा’ला सतावणार

By admin | Updated: January 26, 2017 00:21 IST

सेना-मनसे आक्रमक : भाजपाला घेरण्याची विरोधकांची रणनीती

नाशिक : सन २०१५ - १६ मध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठ्यामुळे नाशिककर पाणीकपातीच्या संकटाचा सामना करत असताना राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत जायकवाडीला पाणी सोडण्याचा झालेला निर्णय आणि त्याबाबत स्थानिक भाजपा आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी बाळगलेले मौन याचे भांडवल आता विरोधकांकडून महापालिका निवडणुकीत केले जाणार असून, प्रामुख्याने, सेना आणि मनसे या पक्षांनी त्याबाबत आक्रमक पवित्रा घेत रणनीती आखली आहे. सन २०१५ मध्ये पावसाने पाठ फिरविल्याने धरणे अर्धवटच भरली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे संकट ओढवले. त्यावेळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा होता. भविष्यात पाण्याची लागणारी गरज ओळखून महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१५ पासूनच शहरात पाणीकपात करत एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर, जलसंपत्ती नियामक प्राधिकरणच्या निर्देशानुसार, गंगापूर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडीला  पाणी सोडण्याचा मुद्दा पुढे  आल्यानंतर नाशिककरांनी त्यास तीव्र विरोध दर्शविला. जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा असताना गंगापूररचे पाणी सोडण्यात येऊ नये, अशीच भूमिका त्यावेळी राजकीय पक्षांनी घेतली. परंतु, राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत विरोध झुगारून रातोरात जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचे तीव्र पडसाद उमटले.  प्रामुख्याने, शिवसेना, मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि माकपा या प्रमुख विरोधी पक्षांनी राज्यातील भाजपा सरकारचा तीव्र निषेध करत पाणी पळवापळवीला विरोध दर्शविला. राजकीय पक्षांसह नागरिक रस्त्यावर उतरले. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि न्यायाधिकरणाचे निर्देश म्हणून भाजपाने त्याचे समर्थन करत गंगापूर धरणातून पाणी सोडलेच. त्यावेळी भाजपाच्या स्थानिक आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी चुप्पी साधली. त्यामुळे भाजपा विरोधात एकच रान पेटले. त्यातूनच, भाजपा आमदारांच्या घरांसमोर सर्वपक्षीय घंटानाद आंदोलने झाली. मोर्चे-निदर्शने झालीत. शिवसेनेने तर मोठा मोर्चा काढत भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात ओढले. या पाणी पळवापळवीमुळे नाशिककरांना ३१ जुलै २०१६ अखेरपर्यंत धरणातील पाणी पुरून-पुरून वापरावे लागले. एकवेळ पाणीकपातीबरोबरच आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंदच्या संकटालाही सामोरे जावे लागले. पुढे २ आॅगस्ट २०१६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे गंगापूर धरण भरले असले तरी हा पाणी पळवापळवीचा मुद्दा महापालिका निवडणुकीत उचलण्याची तयारी विरोधकांनी आधीपासूनच केलेली आहे. त्यामुळे, आता मनपा निवडणुकीच्या प्रचारात पाणी पळवापळवीचा मुद्दा भाजपाला सतावणार असून, त्या दृष्टीने विरोधकांनी रणनीतीही आखली आहे. प्रामुख्याने सेना-मनसेकडून त्याबाबत आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)