शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 01:33 IST

नाशिक- मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकाराचा विरोध नसल्याची पुन्हा एकदा ग्वाही देतानाच ओबींसीचे नेते तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणासह समाजाचे अन्य प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करूच असे अश्वासन दिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चा आणि छगन भुजबळ यांच्या भूमिकेंवरून उलट सुलट चर्चा सुरू होती. त्या पाश्वर्भूमीवर मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि.२०) भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हे अश्वासन दिल्याचे मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देछगन भुजबळ: मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांना ग्वाही

नाशिक- मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकाराचा विरोध नसल्याची पुन्हा एकदा ग्वाही देतानाच ओबींसीचे नेते तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणासह समाजाचे अन्य प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करूच असे अश्वासन दिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चा आणि छगन भुजबळ यांच्या भूमिकेंवरून उलट सुलट चर्चा सुरू होती. त्या पाश्वर्भूमीवर मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि.२०) भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हे अश्वासन दिल्याचे मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायलयाने अंतिरीम स्थगिती दिल्यानंतर समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने नाशिकमध्ये आमदारांना निवेदने देण्यात आली आणि त्यानंतर छगन भुजबळ यांना निवेदन देण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेले तेव्हा भुजबळ हे पूर्वनियोजीत कार्यक्रमासाठी त्र्यंबकेश्वर येथे गेले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनीठिय्या आंदोलन केले. त्यानंतर भुजबळ न भेटल्याने त्यांच्यावर रोष व्यक्त करून कार्यकर्ते निघून गेले होते. तर भुजबळ यांनी देखील वस्तुस्थिती मांडून आपल्याविषयी राजकारण करू नये असे आवाहन केले होते. त्यानंतरजिल्हा समन्वयक सुनील बागुल यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली आणि भुजबळ यांच्याशी संपर्क साधून त्यांची पुन्हा भेट घेण्याचे ठरले. त्यानुसार रविवारी (दि.२०) क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांनी भुजबळ यांची भेट घेतली.मी ओबीसी समाजाचा नेता आहे, हे खरे असले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी माझी पहिल्यापासून भूमिका आहे. मी माझा राष्टÑवादी पक्ष , पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सर्व मंत्री मंडळ हे अखेरपर्यंत मराठाआरक्षणासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली. फुले, शाहु, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत असल्याचे सांगुन भूजबळ यांनी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्रीय राहणार असल्याचे यावेळी सांगितले तर सुनील बागुल यांनी भुजबळ यांच्या संवादातून मार्ग काढण्याचे कौशल्य सांगून हीच गरज असल्याचे मान्य केले. करण गायकर यांनी पालकमंत्री भुजबळ यांच्या विषयी क्रांती मोर्चाच्या मनात आकस नाही.शुक्रवारी (दि.१८) घडलेला प्रकार गैरसमजातून घडला. मात्र मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी भुजबळ यांनी वजन वापरावे अशी अपेक्षा व्यक्त केली.या बैठकीस वत्सला खैरे, राज्य समन्वयक तुषार जगताप, गणेश कदम, शरद तुंगार, शिवा तेलंग, बंटी भागवत, आशिष हिरे, चेतन शेलार, शिवाजी मोरे,संदीप शितोळे, बाळा निगळ, नीलेश शेलार, निलेश मारे, किरण पानकर, योगेश गांगुर्डे, तुषार गवळी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना अधिकारवाणीने समज दिली. तसेच समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही असा शब्द दिल्याचे मोर्चाच्या पत्रकात म्हंटले आहे. समाजाच्या मुलींच्या वसतिगृहाचा प्रश्नउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सोडविण्यात येईल. तसेच सारथी सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न करू असेही भुजबळ यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणChagan Bhujbalछगन भुजबळ