महागड्या ऑक्सिजन प्लांटचा महासभेतही गाजला मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST2021-06-01T04:11:49+5:302021-06-01T04:11:49+5:30
याचवेळी भाजप गटनेते जगदीश पाटील तसेच शाहू खैरे यांनीदेखील काेरोनाकाळात केलेल्या कामांबाबत काही प्रश्न उपस्थित केले. अतिरिक्त आयुक्तांच्या मनमानीविषयी ...

महागड्या ऑक्सिजन प्लांटचा महासभेतही गाजला मुद्दा
याचवेळी भाजप गटनेते जगदीश पाटील तसेच शाहू खैरे यांनीदेखील काेरोनाकाळात केलेल्या कामांबाबत काही प्रश्न उपस्थित केले. अतिरिक्त आयुक्तांच्या मनमानीविषयी बोलताना जगदीश पाटील यांनी कोरोनाच्या नावाखाली सुमारे चारशे कोटी रुपयांची कामे झाली आहेत. त्यातील किती कामे निविदा काढून झाली आणि किती कामे निविदा न काढता केली याची श्वेतपत्रिका काढावी तसेच पुढील महासभेत चौकशी अहवाल ठेवावा, अशी मागणी केली आहे.
महापालिकेच्या साेमवारी (दि. ३१) अंदाजपत्रकीय सभा पार पडली. यावेळी प्रशासनाकडून सुरू असलेल्या मनमानी खर्चाबाबत अनेक नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. गुरूमित बग्गा यांनी यासंदर्भात प्रश्न केला. कोरोनाकाळामुळे नगरसेवक मंजुरी देत आहेत. मात्र, त्याचा विनियोग योग्य होत आहे की नाही हे तपासण्याची गरज आहे. झाकीर हुसेन रुग्णालयातील गळती प्रकरणानंतर अन्य ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारले जात आहेत. मात्र, बिटको रुग्णालयात क्रायोजनिक प्रकल्प राबविण्याचा अट्टाहास केला जात आहे, त्याच प्रशासनाने खुलासा केला आहे. ‘लोकमत’सारख्या दैनिकात यासंदर्भात आलेली बातमी महत्त्वाची असून त्याआधारे चौकशी झाली पाहिजे आणि प्रशासनाने खुलासा केला पाहिजे, असेही बग्गा म्हणाले. महापौर सतीश कुलकर्णी यांनी कोरोनाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांमुळे सध्या नगरसेवक काहीही बोलत नसतील तर गैरसमज करून घेऊ नये कोणत्याही प्रकाराची कधीही चौकशी करण्यात येईल, याची खात्री बागळावी, असा इशाराच संबंधितांना दिला.
इन्फो..
क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट हा सिलिंडर भरून देणारा एक वेगळा उद्येाग आहे तर पीएसए या ऑक्सिजन प्रकारात रुग्णालयांना गरजेपुरता ऑक्सिजन देण्यात येतो, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी गुरूमित बग्गा यांनी केली.
---
छायाचित्र आर फोटोवर ३१ गुरूमित बग्गा