दिंडोरी शहरात विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 01:11 IST2021-05-05T22:06:45+5:302021-05-06T01:11:44+5:30

दिंडोरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिंडोरी येथील लोकनेते स्व प्रकाशबापू मित्र मंडळाच्या वतीने बालभारती स्कुलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींसाठी विलगिकरण केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे.

Isolation room in Dindori town | दिंडोरी शहरात विलगीकरण कक्ष

दिंडोरी शहरात विलगीकरण कक्ष

ठळक मुद्देलोकनेते स्व.प्रकाशबापू मित्रमंडळाने घेतला पुढाकार

दिंडोरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिंडोरी येथील लोकनेते स्व प्रकाशबापू मित्र मंडळाच्या वतीने बालभारती स्कुलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींसाठी विलगिकरण केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे.

दिंडोरीतील स्व.प्रकाश बापू मित्र मंडळाच्यावतीने सामाजिक बांधिलकीतून कोरोना महामारीवर ग्रामस्थांच्या मदतीसाठी पुढाकार घेत विलगीकरण केंद्र सुरु करण्यात आले. येथे रुग्णांना राहण्याची सोय केली असून येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चहा, नाष्टा, जेवण दिले जात आहे. याठिकाणी मनोरंजनसाठी टीव्ही लावण्यात आला आहे. कक्षातील रुग्णाना सेवा सुविधा देण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत.
या करीता प्रितम देशमुख, डॉ. विलास देशमुख, संदीप शेटे, सुयोग धोंगडे, कादवाचे माजी संचालक भाऊसाहेब देशमुख, अमोल देशमुख, नयन बुरड, अविनाश ताडे, दिंडोरी शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, कायकर्ते परिश्रम घेत आहेत.

Web Title: Isolation room in Dindori town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.