पाटबंधारे, बांधकाम खात्याची कानउघाडणी कुंभमेळा

By Admin | Updated: May 6, 2015 01:24 IST2015-05-06T01:23:55+5:302015-05-06T01:24:21+5:30

पाटबंधारे, बांधकाम खात्याची कानउघाडणी कुंभमेळा

Irrigation, Kumbh Mela of the construction department | पाटबंधारे, बांधकाम खात्याची कानउघाडणी कुंभमेळा

पाटबंधारे, बांधकाम खात्याची कानउघाडणी कुंभमेळा

  नाशिक : पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला असतानाही त्र्यंबकेश्वरच्या घाटांचे रखडलेली कामे, जलशुद्धीकरण केंद्राची अर्धवट पाइपलाइन व काही ठिकाणच्या रस्त्यांची कासवगती पाहता ही कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मागणाऱ्या खात्यांची विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी कानउघाडणी केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री चालू महिन्यात नाशिक व त्र्यंबकेश्वरला भेट देणार असल्याने तत्पूर्वी कामे पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले. कुंभमेळा कामांच्या साप्ताहिक आढावा बैठकीत मंगळवारी प्रत्येक विभागाच्या कामांच्या प्रगतीचा अहवाल मागविण्यात आला असता, नाशिक येथील घाट विस्तारीकरणाचे काम पूर्णत्वाच्या मार्गाला असताना त्र्यंबकेश्वर येथे मात्र अजूनही पाहिजे त्या प्रमाणात प्रगती नाही. यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी ३० एप्रिल ही तारीख मुक्रर करण्यात आली होती, परंतु अजूनही कामे सुरूच असल्याबद्दल डवले यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. अर्धवट कामे एका आठवड्यात पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले, परंतु जे दहा महिन्यांत होऊ शकले नाही ते एका आठवड्यात कसे होणार असा उलट सवाल करून, कामे रखडत असतील तर याचा अर्थ ठेकेदारांवर तुमचे नियंत्रण नसल्याचे डवले म्हणाले.

Web Title: Irrigation, Kumbh Mela of the construction department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.