शालिमार, मेनरोड भागात अनियमित वीजपुरवठा

By Admin | Updated: August 12, 2016 23:52 IST2016-08-12T23:51:32+5:302016-08-12T23:52:15+5:30

शालिमार, मेनरोड भागात अनियमित वीजपुरवठा

Irregular power supply in Shalimar, Manorod area | शालिमार, मेनरोड भागात अनियमित वीजपुरवठा

शालिमार, मेनरोड भागात अनियमित वीजपुरवठा

 नाशिक : मेनरोड, शिवाजीरोड, शालिमार भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी व ग्राहक त्रस्त झाले आहेत.
शहराच्या मध्यवर्ती भागात शालिमार, मेनरोड आदि परिसरात अनियमित वीजपुरवठा होत आहे. यासंबंधी माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता धोंगडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
शहराचा मध्यवर्ती व्यापारी पेठ व बँका, शाळा, वाचनालय, एटीएम अशा महत्त्वाच्या संस्था असलेल्या या भागात वीज जाण्याने खूप अडचणी निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या भागात नियमित वीजपुरवठा करावा. तसेच शिवाजी रोड, मेनरोड कॉर्नर, जुने बुकिंग आॅफिसजवळ असलेल्या वीज खांबाचा तळभाग पूर्णपणे सडलेला आहे.
येथून उच्च दाबाचा पुरवठा होत असल्याने सदर खांब त्वरित हटविण्यात यावा, अशी मागणी राजेंद्र बागुल, रवींद्र धोंडवे, आनंद पारचे, उत्तम शेलार, अमोल चव्हाण, शैलेश मंडाले आदिंसह कार्यकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Irregular power supply in Shalimar, Manorod area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.