अनियमित घंटागाड्यांनी महिला हैराण
By Admin | Updated: October 27, 2016 23:49 IST2016-10-27T23:21:40+5:302016-10-27T23:49:17+5:30
अनियमित घंटागाड्यांनी महिला हैराण

अनियमित घंटागाड्यांनी महिला हैराण
येवला : नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालिकेचा प्रभाग क्रमांक चारमध्ये मिल्लतनगर, रायगड, विठ्ठलनगर, वेद कॉलनी, साने गुरुजीनगर, ताज पार्क या भागाचा समावेश होतो.
बदललेल्या प्रभाग पद्धतीत सर्वात कमी (एक हजार ८६७) मतदार असलेला हा प्रभाग आहे. प्रभाग क्र.४ ची लोकसंख्या चार हजार १८० आहे. यात एकूण मतदार एक हजार ८६७ आहेत. यात पुरु ष केवळ ९७९ महिला ८८८ यांचा समावेश आहे. प्रभाग क्र मांक चार मध्ये प्रभाग अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव आहे तर ब-सर्वसाधारण आहे. (वार्ताहर)असा आहे प्रभाग
४उत्तर-पूर्व टोकापासून निघून पूर्वेकडे नगरसूल रस्त्याने रेल्वे चौकीपर्यंत जवळील सर्व्हे नंबर ५८च्या उत्तर-पूर्व टोकापासून दक्षिणेकडे वळून रेल्वेलाईनने सर्व्हेे नंबर ७५ व ५७ पर्यंत व पुढे नागडे रस्ता ओलांडून नागडे शिवारातील सर्व्हे नंबर ५५-अ आणि ५६ पर्यंत ५४ ,७० च्या दक्षिण टोकापर्यंत कोटमगाव रेल्वे चौकीपर्यंत येथून पश्चिमेकडे औरंगाबाद-नाशिक महामार्गाने हॉटेल मनाली शेजारील मोकळ्या जागेपर्यंत व पुढे रिकाम्या प्लॉटपर्यंत येथून उत्तरेकडे वळून कॉलनी रस्त्याने तिवारी यांचे बंगल्यापासून पुढे सरळ रस्त्याने भावसार यांचे गणेश मंडपपर्यंत जाऊन पुढे रस्ता ओलांडून हर्षदीप बंगल्याशेजारी रिकाम्या प्लॉटपर्यंत जाऊन पश्चिमेकडे वळून साने गुरु जीनगरमधील योगीता भालेराव यांचे बंगल्यापर्यंत येऊन पंचशील बंगला, सुगंधाकुंज बंगल्यापासून उत्तरेकडे वळून कॉलनी रस्त्याने ताज पार्क येथील दत्तमंदिरापर्यंत जाऊन रस्ता ओलांडून अय्याज शेख यांच्या शेजारील नजीर कटलरीवाले यांच्या बंगल्यापर्यंत जाऊन पश्चिमेकडे वळून नांदगाव रस्त्यावरील विजेच्या डीपीपर्यंत जाऊन उत्तरेकडे वळून नांदगाव रस्त्याने ताज हॉटेलपर्यंत जाऊन नागडे रस्ता ओलांडून उत्तर-पूर्व टोकापर्यंतच्या दरम्यान असणारा हा भाग प्रभाग क्र मांक चारमध्ये समाविष्ट होतो.
४हा प्रभाग संपूर्णपणे नववसाहत म्हणून मोडतो. माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक उषाताई शिंदे, भारती जगताप, मीना तडवी, संजय कासार हे चार नगरसेवक प्रतिनिधित्व करीत आहेत. प्रभागात नगरसूल रस्त्यासह केवळ डांबरीकरणाची, कॉँक्र ीटीकरणाची कामे झाली आहेत. परिसरात विठ्ठल नगरला जोडून आता मोठी वसाहत निर्माण झाली आहे. रस्त्यांची काही कामे बाकी आहेत.पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम झाले आहे. स्वतंत्र ड्रेनेज व्यवस्था नसल्याने प्रत्येक बंगल्याजवळ शोषखड्डे घेतले गेले आहे. अनेकदा सांडपाणी रस्त्यावर येण्याचे प्रकार होत असतात. भूमिगत गटार योजनेची प्रतीक्षा या भागातील नागरिकांना आहे.
४ प्रभागातील खुल्या जागांचा विकास व्हावा आणि खासगी उद्योजकाने मदत करून येथे खुल्या जागेचा विकास होण्याची अशा या भागातील नागरिकांना आहे. या भागात दोन सार्वजनिक शौचालय बांधले गेले आहे. त्यामुळे नागरिकांना उघड्यावर शौचास बसण्याची समस्या दूर झाली आहे. मुलांना खेळण्यासाठी क्र ीडा संकुल असले तरी कॉलनीजवळील भागात मुलांना खेळण्यासाठी क्र ीडांगण असावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. कॉलनी भागात रस्ते आणि उत्तम प्रकारची पथदीप व्यवस्था, सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटवून चांगल्या नागरी सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा येथील नागरिकांची आहे. या परिसरात दररोज कचरा साफ केला जावा. या भागात घंटागाडी नियमित येत नसल्याच्या तक्र ारी महिलांनी केल्या.