शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जिल्हा परिषद: अनुकंपा भरतीसाठी पात्र उमेदवारांची घालमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 6:31 PM

अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवार गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पाठपुरावा करीत असून, त्यातील काहींच्या वयो मर्यादा संपुष्टात येत आहे अशा परिस्थितीत शासनाने अनुकंपा भर्तीवरील निर्बंध उठवावेत अशी मागणी

ठळक मुद्दे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पाठपुरावा

नाशिक :  जिल्हा परिषदेच्या रिक्त घोषित केलेल्या एकूण जागेच्या भरती योग्य 10 ते 20 टक्के जागा अनुकंपा तत्वाने भरण्यास यापूर्वीच राज्य शासनाने अनुमती दिली असून त्याआधारे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने तयारीही पूर्ण केली परंतु कोरोनामुले शासनाने कोणतीही भरती करण्यास स्थगिती दिल्याने अनुकंपा भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची घालमेल वाढली आहे. नोकरीची वयाचे कालावधी संपुष्टात येऊ नये म्हणून शासनाने त्वरित अनुकंपा भरतीला मान्यता द्यावी अशी मागणी केली जात आहे.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी होत असलेला खर्च पाहता राज्य सरकारने सर्व प्रकारचे खर्चावर निर्बंध आणले आहेत, कोणतीही नवीन पद भरती न करण्याचे शासनाचे धोरण असले तरी ते अनुकंपा साठी पत्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मारक ठरू पाहते आहे, या पुर्वी शासनाने एकूण रिक्त पदांच्या 10 ते 20 टक्के पदे अनुकंपा तुन भरण्यास मुभा दिली होती, त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेने पात्र ठरू पाहणाऱ्या सुमारे 64 उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले व अन्य उमेदवारांची कागदपत्रे पूर्तता तसेच सेवा जेष्ठता यादी तयार करून प्रकियेला सुरुवात केली होती. मात्र कोरोनामुळे शासनाने घेतलेला निर्णय अनुकंपा भरतीसाठी देखील लागू पडत असल्याने शासनासह अनुकंपाचे उमेदवारांचा नाईलाज झाला आहे, दुसरीकडे शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून, कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांवर त्याचा अतिरिक्त ताण पडु लागला आहे.अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवार गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पाठपुरावा करीत असून, त्यातील काहींच्या वयो मर्यादा संपुष्टात येत आहे अशा परिस्थितीत शासनाने अनुकंपा भर्तीवरील निर्बंध उठवावेत अशी मागणी राज्य शासकीय निमशासकीय लिपीकवर्गीय हक्क परिषद, जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे केली आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस