नाशिक : जिल्हा परिषदेच्या रिक्त घोषित केलेल्या एकूण जागेच्या भरती योग्य 10 ते 20 टक्के जागा अनुकंपा तत्वाने भरण्यास यापूर्वीच राज्य शासनाने अनुमती दिली असून त्याआधारे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने तयारीही पूर्ण केली परंतु कोरोनामुले शासनाने कोणतीही भरती करण्यास स्थगिती दिल्याने अनुकंपा भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची घालमेल वाढली आहे. नोकरीची वयाचे कालावधी संपुष्टात येऊ नये म्हणून शासनाने त्वरित अनुकंपा भरतीला मान्यता द्यावी अशी मागणी केली जात आहे.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी होत असलेला खर्च पाहता राज्य सरकारने सर्व प्रकारचे खर्चावर निर्बंध आणले आहेत, कोणतीही नवीन पद भरती न करण्याचे शासनाचे धोरण असले तरी ते अनुकंपा साठी पत्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मारक ठरू पाहते आहे, या पुर्वी शासनाने एकूण रिक्त पदांच्या 10 ते 20 टक्के पदे अनुकंपा तुन भरण्यास मुभा दिली होती, त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेने पात्र ठरू पाहणाऱ्या सुमारे 64 उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले व अन्य उमेदवारांची कागदपत्रे पूर्तता तसेच सेवा जेष्ठता यादी तयार करून प्रकियेला सुरुवात केली होती. मात्र कोरोनामुळे शासनाने घेतलेला निर्णय अनुकंपा भरतीसाठी देखील लागू पडत असल्याने शासनासह अनुकंपाचे उमेदवारांचा नाईलाज झाला आहे, दुसरीकडे शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून, कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांवर त्याचा अतिरिक्त ताण पडु लागला आहे.अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवार गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पाठपुरावा करीत असून, त्यातील काहींच्या वयो मर्यादा संपुष्टात येत आहे अशा परिस्थितीत शासनाने अनुकंपा भर्तीवरील निर्बंध उठवावेत अशी मागणी राज्य शासकीय निमशासकीय लिपीकवर्गीय हक्क परिषद, जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे केली आहे.
जिल्हा परिषद: अनुकंपा भरतीसाठी पात्र उमेदवारांची घालमेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:31 IST
अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवार गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पाठपुरावा करीत असून, त्यातील काहींच्या वयो मर्यादा संपुष्टात येत आहे अशा परिस्थितीत शासनाने अनुकंपा भर्तीवरील निर्बंध उठवावेत अशी मागणी
जिल्हा परिषद: अनुकंपा भरतीसाठी पात्र उमेदवारांची घालमेल
ठळक मुद्दे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पाठपुरावा