बिटको बॉईज हायस्कूल व्हॉलीबॉल स्पर्धेत अजिंक्य
By Admin | Updated: September 16, 2014 00:05 IST2014-09-15T22:54:32+5:302014-09-16T00:05:50+5:30
बिटको बॉईज हायस्कूल व्हॉलीबॉल स्पर्धेत अजिंक्य

बिटको बॉईज हायस्कूल व्हॉलीबॉल स्पर्धेत अजिंक्य
नाशिक : दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित श्री. डी. डी. बिटको बॉईज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या संस्थेतील १४ वर्षे व १९ वर्षे वयोगटातील या दोन्ही संघांनी क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांनीआयोजित केलेल्या मनपा जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात जु. स. रुंग्ठा हायस्कूल यांचा सरळ २५-१७, २५-२३ या सरळ दोन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. यात धनराज जाधव, रोहित साळवे, आकाश परदेशी, गौरव वायभासे, आलिफ तांबोळी, हर्षल देवरे, हर्षल जगताप, तर १९ वर्षे वयोगटातील मुलांनी बिटको बॉईज कॉलेज नाशिकरोड यांचा २५-१५, १५-१८ या सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. यात धीरज गायकवाड, तुषार जगदाळे, अमित साळवे, नामदेव घुलूम, तुषार अहेर, आकाश व्यवहारे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विजेत्या संघांना राजेंद्र शिंदे, राष्ट्रीय मार्गदर्शक दिनेश जाधव, किरण कविश्वर, अनिल ठाकरे, शिवराम सातभाई, राजेंद्र सोमवंशी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्यांना संघाचे मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वैशंपायन, उपाध्यक्ष प्रकाश वैशंपायन, स्कूल कमिटी अध्यक्ष रोहित वैशंपायन, संस्थेचे सेक्रेटरी हेमंत बरकले, शाळेच्या मुख्याध्यापक शुभलक्ष्मी कुलकर्णी, शाळेच्या उपमुख्याध्यापक पेंढारकर, उपमुख्याध्यापक महाजन, पर्यवेक्षक निकम, वाळुंजे, जोशी संस्थेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.