गुंतवणूकदारांची १८ लाखांची फसवणूक‘आस्था’ची अनास्था : आश्वासनांचे गाजर
By Admin | Updated: July 20, 2014 01:45 IST2014-07-19T21:27:25+5:302014-07-20T01:45:16+5:30
गुंतवणूकदारांची १८ लाखांची फसवणूक‘आस्था’ची अनास्था : आश्वासनांचे गाजर

गुंतवणूकदारांची १८ लाखांची फसवणूक‘आस्था’ची अनास्था : आश्वासनांचे गाजर
वणी : दिंडोरी तालुक्याला आर्थिक फसवणुकीचे ग्रहण लागले असून, लखमापूरच्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीमुळे तालुका पुन्हा प्रकाशझोतात आला आहे.
आस्था इंटरनॅशनल कंपनीने एजंटांच्या माध्यमातून विविध योजनांमध्ये अविश्वसनीय फायद्याचे गाजर दाखवित छत्तीस गुंतवणूकदारांची अठरा लाखांच्या अनेक फसवणुकीच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्याच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहे. गुजरात, आसाम, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या कंपनीविरोधात आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी आहेत. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावातील गुंतवणूकदार व एजंटाची भेट एका धार्मिक कार्यक्रमात झाली. साखरपेरणीची भाषा वापरून धार्मिकतेच्या स्पर्शाच्या प्रभावाखाली ग्रामीण भागातील जनतेला फसविण्याचे कसब असलेल्यांनी ३६ गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. यापूर्वी कृष्णगाव येथे कार्यालयाकडून अंजनी ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेच्या संचालकांनी अनेकांना लाखो रुपयांना बिगरव्याजी कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे प्रकरण फारसे जुने नाही. तसेच वणीतील प्रतिष्ठित कुटुंबातील पती-पत्नीने जय अंबे ट्रेडिंग नावाची बनावट कंपनी स्थापून कमी कालावधीत दुप्पट तिप्पट रकमांचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडविले होते व ही सर्व रक्कम छत्तीसगडमधील रायपूर या ठिकाणी नातेवाइकांच्या नावाने मालमत्तांमध्ये गुंतविल्याचे उघड झाले होते.
याचा तपास वणी पोलिसांनी करून बेकायदा व्यवहारांची कागदपत्रे जप्त केली होती, मात्र पोलिसांच्या स्तरावरच हे प्रकरण गुंडाळण्यात आले. आजही आमिष दाखविणारे उजळ माथ्याने वावरत असून, गुंतवणूकदार त्यांच्या नावाने मात्र बोटे मोडीत आहेत.