‘त्या’ तिघा कर्मचाºयांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:18 IST2017-09-25T01:18:51+5:302017-09-25T01:18:55+5:30
आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनसजवळ संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या तीन युवकांचा आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी पाठलाग सुरू केल्याने पळ काढताना तिडके कॉलनीतील पवन प्रतीक पाटील (२५) याचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१६) उघडकीस आली़ या प्रकरणातील गुन्हे शोध पथकातील नाजीर शेख, नितीन गायकवाड व वैभव परदेशी या तीन कर्मचाºयांची पोलीस आयुक्तांनी प्राथमिक चौकशी सुरू केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़

‘त्या’ तिघा कर्मचाºयांची चौकशी
पंचवटी : आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनसजवळ संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या तीन युवकांचा आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी पाठलाग सुरू केल्याने पळ काढताना तिडके कॉलनीतील पवन प्रतीक पाटील (२५) याचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१६) उघडकीस आली़ या प्रकरणातील गुन्हे शोध पथकातील नाजीर शेख, नितीन गायकवाड व वैभव परदेशी या तीन कर्मचाºयांची पोलीस आयुक्तांनी प्राथमिक चौकशी सुरू केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़ गुन्हे शोध पथकाचे पोलीस पाठलाग करीत असताना पवन पाटील, जितेंद्र रामकुमार शर्मा व सुनील साहेबराव जमदाडे हे तिघेही विहिरीत पडले़ यापैकी शर्मा व जमदाडे या दोघांना पोलिसांनी वाचविले़ मात्र घटनेस दोन दिवस उलटूनही बेपत्ता पवनचा पोलिसांनी शोध न घेतल्याने संशय निर्माण झाला होता़ तसेच पोलिसांच्या पाठलागामुळे मुलाचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता़ तसेच साडेतीन वाजेची घटना असताना पोलिसांनी अग्निशमन दलास उशिरा माहिती का दिली, पोलीस पाठलाग करीत होते तर हे ट्रक टर्मिनसजवळ असताना महामार्ग ओलांडून हे तिघे इकडे कसे पळाले, असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
देहविक्री व्यवसाय जोमात
आडगाव शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास देहविक्री व्यवसाय जोमात सुरू असून, या व्यवसायास पोलिसांकडूनच खतपाणी घातले जात असल्याची चर्चा आहे़ तसेच वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या या युवकांची माहिती गुन्हे शोध पथकातील पोलिसांना या देहविक्रय करणाºया महिलांनीच दिल्याची चर्चा होती. पोलीस आयुक्तांनी या घटनेची दखल घेतली असून, या तिघाही पोलीस कर्मचाºयांची प्राथमिक चौकशी सुरू केली असून दोषी आढळल्यास कारवाई केली जाणार आहे़