जंक्शन स्थानकावर तपासणी मोहीम

By Admin | Updated: May 12, 2017 01:36 IST2017-05-12T01:36:32+5:302017-05-12T01:36:42+5:30

मनमाड रेल्वेस्थानकावर शहर पोलीस ठाणे व रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली

Investigation campaign at junction station | जंक्शन स्थानकावर तपासणी मोहीम

जंक्शन स्थानकावर तपासणी मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : मालेगाव येथे होणाऱ्या शब्बे बरातच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे जंक्शन म्हणून ओळख असलेल्या मनमाड रेल्वेस्थानकावर शहर पोलीस ठाणे व रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली.
मनमाड जंक्शन स्थानकावर दिवसभरात अनेक प्रवाशी गाड्यांची जा ये होत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मालेगावी होणाऱ्या शब्बे बरातच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून सुरक्षिततेच्या बाबतीत काळजी घेण्यात येत आहे.
मालेगाव येथे भिकाऱ्याच्या वेशात अन्य कोणी जाऊ नये यासाठी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळे व रेसुब निरीक्षक के. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेस्थानकावर तपासणी मोहीम राबविण्यात आली. रेल्वे स्थानकावरील सर्व फलाट, बुकिंग कार्यालय, पादचारी पूल आदी ठिकाणी कसून तपासणी करण्यात आली. स्थानकावरील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेबाबत सूचना देण्यात आल्या.

Web Title: Investigation campaign at junction station