शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आविष्कार : कुबडीसह खुर्चीची संकल्पना दोघा युवकांनी बनविली अपंगांसाठी ‘चेअरक्रच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:32 IST

नाशिक : आजच्या आधुनिक काळात दिव्यांगाच्या सुलभतेसाठी व्हिलचेअर अनेक साधणे उपलब्ध झालेली आहेत. दिव्यांगांना चालताना दम लागतो आणि कुठेतरी थांबावे लागते. दिव्यांग व्यक्तींची गरज लक्षात घेऊन दोघा युवकांनी ‘चेअरक्रच’ हे उपकरण तयार केले आहे. स्वप्नील राजगुरू व आशिष उगले असे या युवकांचे नाव आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या शोधाचा दिव्यांगांना मोठा ...

ठळक मुद्देदिव्यांग व्यक्ती सदर उपकरण नेहमी आपल्या सोबत नेऊकुबडीप्रमाणे एक खुर्ची असायला हवी, असा विचार

नाशिक : आजच्या आधुनिक काळात दिव्यांगाच्या सुलभतेसाठी व्हिलचेअर अनेक साधणे उपलब्ध झालेली आहेत. दिव्यांगांना चालताना दम लागतो आणि कुठेतरी थांबावे लागते. दिव्यांग व्यक्तींची गरज लक्षात घेऊन दोघा युवकांनी ‘चेअरक्रच’ हे उपकरण तयार केले आहे. स्वप्नील राजगुरू व आशिष उगले असे या युवकांचे नाव आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या शोधाचा दिव्यांगांना मोठा लाभ होऊ शकतो. तसेच दिव्यांग व्यक्ती सदर उपकरण नेहमी आपल्या सोबत नेऊ शकेल.चेअरक्रचची कल्पना कशी सुचली याची माहिती देताना राजगुरू म्हणाले की, रस्त्याने जाताना एक वयोवृद्ध दिव्यांग महिला कुबडीसह पडली असता तिला हात देऊन उठविले. परंतु तिला बसवावे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला. तसेच माझा मित्र आशिष उगले हादेखील दिव्यांग असल्याने समस्यांची जाणीव झाली. त्यातून आम्ही दोघांनी दिव्यांगासोबत कायमस्वरूपी कुबडीप्रमाणे एकखुर्ची असायला हवी, असा विचार करून उपकरण तयार करण्याचे ठरविले.कुबडीच खुर्ची करावी या संकल्पनेतून ‘चेअरक्रच’ची निर्मिती केली. त्यापूर्वी अनेक दिव्यांग बांधव व भगिनींना भेटून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. चेअरक्रच खुर्चीचे वैशिष्ट्य म्हणजे ती अ‍ॅडजेस्टेबलआहे. दिव्यांगाच्या उंची कमी जास्त करता येते. त्याचबरोबर सुमारे ९० किलो वचनाची व्यक्तीही त्यावर बसू शकते.