शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

'आरटीओ'ची प्रतिमा मलीन करण्याचा डाव : भरत कळसकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 14:54 IST

गुन्ह्याचा तपासाचा गोपनीय अहवाल पोलीस अधीक्षकांकडून प्राप्त झाल्यानंतर शासनाने या अहवालानुसार चालू वर्षी जानेवारीत तक्रारदार गजेंद्र पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली

ठळक मुद्देआरोपांबाबतचे पुरावेही तक्रारदाराने पोलिसांकडे द्यावेबदल्यांचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे नाही

नाशिक : एका निलंबित अधिकाऱ्याने वाममार्गाने ज्या खात्यात आपण नोकरी केली त्याच खात्याची प्रतिमा मलीन करण्याचे षडयंत्र रचून अधिकाऱ्यांविषयी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे पूर्णपणे निराधार असल्याचे नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या प्रसिद्धीपत्रकवजा खुलाशात म्हटले आहे.आरटीओच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीबाबत शहर पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कळसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या तक्रार अर्जामधील सर्व आरोपांचे खंडन केले आहे. एका अधिकाऱ्याच्या मयत पत्नीविषयी आक्षेपार्ह व मानहानीकारक मजकूर असलेली पत्रके रात्रीच्या सुमारास धुळे कार्यालयात आणून टाकल्याच्या गुन्ह्याचा तपासाचा गोपनीय अहवाल पोलीस अधीक्षकांकडून प्राप्त झाल्यानंतर शासनाने या अहवालानुसार चालू वर्षी जानेवारीत तक्रारदार गजेंद्र पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, असे कळसकर यांनी म्हटले आहे. पाटील यांनी केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी होणे हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग असून ती अवश्य झाली पाहिजे, असेही कळसकर यांनी स्पष्ट केले आहे. तक्रारीतील आरोपांबाबतचे पुरावेही तक्रारदाराने पोलिसांकडे द्यावे, असेही ते म्हणाले.वाहनांची नोंदणीविषयी माहिती संगणकीय प्रणालीवरजळगाव येथे इर 4 वाहन नोंदणी मध्ये २,४०० वाहनांची प्रत्येकी १२ हजार रुपये घेत नोंदणी केली, असा आरोप तक्रारीत केला गेला आहे. हा आरोप पूर्णपणे निराधार व खोटा आहे. कारण या नोंदणी प्रक्रियेचा अहवाल परिवहन आयुक्त कार्यालयाकडे पाठविला गेला आहे. ही सर्व माहिती संगणकावर ५ंँंल्ल 4 या प्रणालीवर सर्वत्र उपलब्ध आहे. धुळ्याचे प्रभारी पदभार सांभाळताना जळगाव कार्यालयाचे नोंदणी अधिकारी अथवा अपिलीय अधिकारी मी कसा असू शकतो, असा प्रश्नही कळसकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच कुठल्याही बदल्यांचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेले नाही, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRto officeआरटीओ ऑफीसfraudधोकेबाजी