शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील तीन हजार ७३ वस्तीशाळा बंद करण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 01:45 IST

वस्त्यांमध्ये शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर संकट उभे  ठाकले असून  राज्यातील ३ हजार ७३ शाळा बंद करण्याचा  शिक्षण विभागातर्फे डाव रचला जात आहे.  त्यात नाशिक जिल्ह्यातील २४७ वस्तीशाळांचा समावेश आहे. यात ग्रामीण भागातील २४१ आणि शहरी भागातील ६ शाळांचा समावेश  आहे. 

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील २४७ वस्तीशाळांचा समावेशनव्या अध्यादेशावर वादंग होण्याची शक्यता

शफीक शेख/  मालेगाव : वस्त्यांमध्ये शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर संकट उभे  ठाकले असून  राज्यातील ३ हजार ७३ शाळा बंद करण्याचा  शिक्षण विभागातर्फे डाव रचला जात आहे.  त्यात नाशिक जिल्ह्यातील २४७ वस्तीशाळांचा समावेश आहे. यात ग्रामीण भागातील २४१ आणि शहरी भागातील ६ शाळांचा समावेश  आहे. विद्यार्थ्यांना इतर गावांत जाऊन शिक्षण घेण्यासाठी प्रवासाची सुविधा आणि प्रवास भत्ता देण्यासाठीचा शासन निर्णयाचा जीआर शिक्षण विभागातर्फे  काढण्यात आला आहे.  २४ मार्च रोजी जारी केला. या  जीआरवरून येत्या काही दिवसांत वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील बालकांना त्यांच्याच गावात प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे.  मात्र,  शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेला जीआर हा धक्कादायक असून यामुळे तीन हजारांहून अधिक शाळा बंद केल्या जाणार असल्याचा घाट घातला जात असल्याचे यातून स्पष्टपणे दिसत असल्याचा आरोप अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने केला आहे. शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या जीआरमध्ये राज्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रातील एकूण ३ हजार ७३ गावे आणि त्या वस्त्यांतील तब्बल १६ हजार ३३४ विद्यार्थांना त्यांच्या मूळ गावी शिक्षण उपलब्ध होऊ शकत नसल्याने त्यांना जवळच्या गावी शिक्षण घेण्यासाठी प्रवास भत्ता आणि प्रवासाची सोय करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्य सरकारने महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ मधील कलम ४ मधील उपकलम ३ नुसार ज्या ठिकाणी सदर नियमातील परिशिष्ट -१ , कलम ४ मधील पोटनियम ( १ ) ( क ) व ( ख ) अंतर्गत विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे नजीकच्या शाळेच्या क्षेत्रामध्ये किंवा हद्दीच्या आत शाळा उपलब्ध नाही अशा  राज्य शासनाने ठरवून दिलेल्या लहान वस्तीमधील बालकांकरिता शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण देण्याच्या प्रयोजनार्थ वाहतूक भत्ता, वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रातील एकूण ३ हजार ७३ वसतिस्थाने आणि त्यातील १६ हजार ३३४ विद्यार्थी निश्चित करण्यात आले आहेत, असे या जीआरमध्ये स्पष्ट केले.शिक्षण विभागाचा अध्यादेश धक्कादायक शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील बालकांना त्यांच्याच गावात प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेला जीआर हा धक्कादायक असून यामुळे तीन हजारांहून अधिक शाळा बंद केल्या जाणार असल्याचा घाट घातला जात असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचा आरोप अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने केला आहे. राज्य शासनाने शासन निर्णयाचा  फेरविचार करावा आणि ३ हजार ७३ शाळा बंद करण्यात येऊ नयेत, अशी मागणी राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी केली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणSchoolशाळा