शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

आंतरराज्यीय टोळी ताब्यात : वऱ्हाडी बनून यायचे अन‌् दागिने लंपास करुन पळून जायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 20:37 IST

मध्यप्रदेशस्थित संशयित बनावट वऱ्हाडी गुन्हेगारांची टोळी महाराष्ट्रातील विविध मोठ्या शहरांमध्ये दाखल होत १४ ते १५ वर्षांच्या मुलामार्फत मौल्यवान दागिन्यांची पर्स, बॅग मंगल कार्यालये, लॉन्समधून पळवत होती.

ठळक मुद्देइंदुरमधील ढाब्यावरुन गुन्हे शाखेच्या पथकाने बांधल्या मुसक्यामध्यप्रदेशस्थित संशयित बनावट वऱ्हाडी गुन्हेगारांची टोळी लग्नसोहळ्यातून १६ तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख ४० हजाराची रोकड चोरी

नाशिक : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शहर व परिसरातील सुरु झालेल्या विविध लग्नसमारंभांमध्ये मौल्यवान दागिने चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यामुळे गुन्हे शाखेची पथके घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाला यश आले. वऱ्हाडीचा बनाव करत लग्नाला उपस्थित राहून तेथे रेकी करत मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या पोलिसांनी मध्यप्रदेशच्या इंदुरमधून आवळल्या आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, डिसेंबर महिन्यात गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील एका लॉन्समध्ये पार पडलेल्या एका लग्नसोहळ्यातून १६ तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख ४० हजाराची रोकड चोरी गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्यादी योगिनी कातकाडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना शहरात कुठल्याहीप्रकारचे धागेदोरे मिळत नव्हते. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाला याबाबत माग काढण्याचे आदेश दिले. पथकाने समांतर तपास सुरु केला; मात्र गुन्ह्याची कार्यपध्दती अत्यंत वेगळ्या प्रकारची असल्याने पुर्वानुभवाच्याअधारे या गुन्ह्यात सहभागी गुन्हेगार हे सराईत मध्यप्रदेश राज्यातील असल्याचा कयास पोलिसांनी लावला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंद वाघ, सहायक निरिक्षक महेश कुलकर्णी, येवाजी महाले, विशाल काठे यांच्या पथकाने अत्यंत तोकड्या माहितीवरुन मध्यप्रदेशमधील इंदुर गाठले. इंदुरसह विविध शहरांमध्ये गोपनीयरित्या माहिती घेत तीन दिवस पथकाने ठिकठिकाणी सापळेही रचले मात्र गुन्हेगार पथकाच्या हाती लागत नव्हते. मिळालेल्या एका सुगाव्यावरुन पोलिसांनी संशयास्पद कारवर पाळत ठेवली आणि एका ढाब्याच्या आवारात सापळा लावला. राखाडी रंगाची मारुती स्विफ्ट कारमधून (एम.पी०४ टीसी १३३२) संशयित गुन्हेगार ढाब्यावर आले असता साध्या वेशातील पथकाने सिनेस्टाइल त्यांना ताब्यात घेतले. अजयसिंग कप्तानसिंग सिसोदिया (२५), बादल कृष्णा सिसोदिया (१९), पर्वतसिंग मिस्त्रीलाल सिसोदिया (४५,रा.तिघे गुलखेडी, पिपलीयारसोडा, जि.राजगड, मध्यप्रदेश) अशी तीघा संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी या तीघांकडून गुन्ह्यात वापरलेली कार व तीन मोबाइल जप्त केले आहेत. या तीघांना गंगापुर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिसांनी न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि.५) पोलीस कोठडी सुनावली.मोठ्या शहरांमधील लग्नसोहळ्यात हातसफाईमध्यप्रदेशस्थित संशयित बनावट वऱ्हाडी गुन्हेगारांची टोळी महाराष्ट्रातील विविध मोठ्या शहरांमध्ये दाखल होत १४ ते १५ वर्षांच्या मुलामार्फत मौल्यवान दागिन्यांची पर्स, बॅग मंगल कार्यालये, लॉन्समधून पळवत होती. या टोळीचे नेटवर्क मोठे असून या टोळीने आतापर्यंत नाशिकसह पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, संगमनेर तसेच गुजरातमधील सुरत, वापी, अहमदाबाद, तलासुरी, नवसारी आदी शहरांमध्ये अशाचप्रकारे दागिने व रोकडवर डल्ला मारल्याचे तपासात पुढे आले आहे.---

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकRobberyचोरीmarriageलग्नMadhya Pradeshमध्य प्रदेश