शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

कारमधून रोकड लांबविणारी आंतरराज्यीय टोळी इंदोरमधून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 19:27 IST

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यांत या टोळीचा धुमाकूळ होता. या राज्यांतील विविध शहरांमध्ये यांच्याविरुध्द जोरी, जबरी चोरी, लूटीचे गुन्हे दाखल आहेत.

ठळक मुद्देसात संशयितांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.९) पोलीस कोठडी सुनावली जाधव यांची रोकड लांबविल्याची कबुली

नाशिक : पाळत ठेवून रोकड घेऊन जाणाऱ्या कारचालकांचे लक्ष विचलित करुन त्यांच्या कारमधून रोकडची बॅग घेत पळ काढणारी आंतरराज्यीय टोळी मध्यप्रदेशमधील इंदुर शहरातून गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने सापळा रचून जेरबंद केली. एकूण आठ चोरट्यांच्या मुसक्या बांधण्यास पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून इनोव्हा कारदेखील जप्त करण्यात आली आहे.मागील महिन्यात सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील एम.जी.रोडवर सेवानिवृत्त उपसंचालक रामचंद्र जाधव (रा.बोधलेनगर) यांची दिशाभूल करुन त्यांच्या कारमधून एक लाख रुपयांच्या रोकड असलेली दोन बॅगा घेऊन चोरटे भरदिवसा पसार झाले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता. गुन्हे शाखा युनीट-१चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ, सहायक निरिक्षक महेश कुलकर्णी यांना या गुन्ह्यातील संशयित दिल्ली येथील असल्याची माहिती मिळाली. त्यांच्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले असता, ते पुन्हा दिल्ली येथून रविवारी नाशकात चोरीच्या उद्देशाने येत तेथून पुढे मध्यप्रदेश राज्यात पसार होणार असल्याची खात्रीशिर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाघ यांनी पथक तयार करुन इंदुरला रवाना केले. इंदुरमध्ये दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तेथील हॉटेल लॉजमधे झाडाझडती घेत महु जिल्ह्यातील बंजारी गावातून संशयित कांगत्रम सैल्ली दुराई, पवन मोहनलाल, आकाश मोहनलाल, मनतोश अली उर्फ मुत्तु, मरियप्पा काली बाबू, विनोद राजेंद्र, साहील सुरेश तसेच त्यांचा एक अल्पवयीन साथीदार अशा आठ संशयित अट्टल चोरट्यांच्या टोळीला बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातील इनोव्हा कार (एच.आर २६. बीआर ९०४४) जप्त केली. त्यांच्या ताब्यातून सात मोबाइल, दोन मिरची स्प्रे, एक रबरी गलोल, ५० लोखंडी छर्रे, ७० हजारांची रोकड असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.या राज्यांमध्ये होता 'गँग'चा धुमाकूळमहाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यांत या टोळीचा धुमाकूळ होता. या राज्यांतील विविध शहरांमध्ये यांच्याविरुध्द जोरी, जबरी चोरी, लूटीचे गुन्हे दाखल आहेत. लॉकडाऊननंतर ही टोळी नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, इंदुर, अहमदाबाद, दिल्ली या शहरांकडे वळाल्याचे निशाणदार यांनी सांगितले. या सात संशयितांना न्यायालयाने येत्या सोमवारपर्यंत (दि.९) पोलीस कोठडी सुनावली आहे. जाधव यांची रोकड लांबविल्याची कबुलीही चोरट्यांनी दिली आहे. त्यांच्याकडून अजून काही गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकCrime Newsगुन्हेगारी