अन्नप्रक्रिया उद्योगाला आंतरराष्टÑीय बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:35 IST2017-09-26T23:54:22+5:302017-09-27T00:35:10+5:30
भारत हा कृषिप्रधान देश असला तरी या देशात दुष्काळ, वादळीवारा, गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटांचा येथील शेतकºयांना सामना करावा लागतो. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत असून, शेतकºयांनी स्वावलंबी होऊन अन्नावर आधारित प्रक्रिया करण्याची गरज असल्याचे प्रतिपाद ‘इंडो एशियन बिझनेस’चे संचालक विनोद पाटरकर यांनी केले.

अन्नप्रक्रिया उद्योगाला आंतरराष्टÑीय बाजारपेठ
नाशिक : भारत हा कृषिप्रधान देश असला तरी या देशात दुष्काळ, वादळीवारा, गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटांचा येथील शेतकºयांना सामना करावा लागतो. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत असून, शेतकºयांनी स्वावलंबी होऊन अन्नावर आधारित प्रक्रिया करण्याची गरज असल्याचे प्रतिपाद ‘इंडो एशियन बिझनेस’चे संचालक विनोद पाटरकर यांनी केले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अग्रीकल्चरतर्फे बाबूभाई राठी सभागृहात आयोजित ‘अन्नप्रक्रि या उद्योगातील संधी व बाजारपेठेतील उपलब्धता’ या विषयावर पाटरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, सहायक आयुक्त वाय. के. बेंडकुळे, कृषी अधिकारी धनंजय वारडीकर, सुनीता फाल्गुने आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्न व फळांवर केलेल्या प्रक्रि येच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. देशासह देशाबाहेरही या प्रकारच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध असून, शेतकºयांनी या दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे आहे. चीनमधील उद्योग आपल्या बाजारपेठेत येऊन त्याला मागणी मिळत आहे. चीनमध्ये आपण आपला असा प्रक्रिया केलेला माल विक्री करू शकतो. अन्नप्रक्रिया उद्योग करू इच्छिणाºया शेतकºयांना चेंबरच्या माध्यमातून मार्गदर्शन व मदत केली जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नप्रक्रि या उद्योगाला चालना देण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाणार असल्याची माहिती बेंडकुळे यांनी यावेळी दिली.