हिरे महाविद्यालयास आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक
By Admin | Updated: February 13, 2017 14:18 IST2017-02-13T14:18:47+5:302017-02-13T14:18:47+5:30
लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचा खेळाडू प्रतिक बोरसे आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची झेप घेत आहे.
हिरे महाविद्यालयास आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक
नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचा खेळाडू प्रतिक बोरसे आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची झेप घेत आहे. नेदरलँड्स येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय इंटरशूट शूटिंग स्पर्धेत भारतीय संघात हिरे महाविद्यालयाचा प्रतिक बोरसे याची निवड करण्यात आली. स्पर्धेत १० मिटर रायफल शूटिंग या क्रिडा प्रकारत भारतीय संघाच्या प्रतिक बोरसेल एक सुवर्णपदक आणि एक कास्यपदक पदाकाचा मानकरी ठरला. यावर्षातील त्याची ८ वी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. राष्ट्रीय पातळीवर संघटनेकडून नुकत्याच जाहीर झालेल्या यादीप्रमाणे प्रतिक बोरसे याला ६ वे मानाकन प्राप्त झाले आहे.