आदिवासींच्या शिक्षण सेवेसाठी ‘करडी पाथ’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:18 IST2021-06-09T04:18:20+5:302021-06-09T04:18:20+5:30
कोरोना काळात करडी पाथमार्फत गाव पातळीवर विद्यार्थ्यांपर्यंत पोचताना उपयुक्त ठरणारी संसाधने अँड्रॉइड मोबाईल ॲप व लघू चित्रफितीच्या माध्यमातून शिक्षकांना ...

आदिवासींच्या शिक्षण सेवेसाठी ‘करडी पाथ’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
कोरोना काळात करडी पाथमार्फत गाव पातळीवर विद्यार्थ्यांपर्यंत पोचताना उपयुक्त ठरणारी संसाधने अँड्रॉइड मोबाईल ॲप व लघू चित्रफितीच्या माध्यमातून शिक्षकांना देण्यात आले. या संसाधनांमुळे आदिवासी भागातील प्रकल्पामध्ये कोरोनामुळे बंद असलेली शिक्षणाची दारे खुली झाली. खुली मैदाने, घरासमोरील पडती, गावातील मंदिरे तसेच गल्लीतदेखील या संसाधनांचा वापर करून शिक्षकांनी शाळा सुरू ठेवली, काही ठिकाणी तर खासगी वाहनांचा वापर करून शिक्षकांनी चालती-फिरती शाळाच सुरू केली . अध्ययन-अध्यापनाच्या पद्धतीला कलाटणी देणाऱ्या व नावीन्यपूर्ण साधनांचा वापर करणाऱ्या अशा सर्व यशोगाथांची दखल लंडन बुक फेयरने घेतली आहे. करडी पाथ संस्थेने नाशिक प्रकल्पांतील दोन एकलव्य व ४० आदिवासी आश्रमशाळा अशा एकूण ४२ शाळांसह नंदुरबार जिल्ह्यातील ४२४ जिल्हा परिषद शाळांमध्ये करडी पाथचा मॅजिक इंग्लिश वाचन उपक्रम राबविला असून महाराष्ट्र आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील १४ प्रकल्प कार्यालयांच्या ३९३ एकलव्य आश्रमशाळा तसेच शासकीय आश्रमशाळांमध्येदेखील करडी पाथ कार्यरत आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात खालपूर तालुक्यातील १७ जिल्हा परिषद शाळांमध्येही या संस्थेचे काम सुरू असल्याची माहिती संस्थेच्या विभागीय प्रकल्पाचे उपव्यवस्थापक आदित्य अनावट यांनी दिली.
इन्फो-
पुढील वाटचालीसाठी प्रेरणाही
करडी पाथच्या नवीन्यपूर्ण उपक्रम व भाषा प्रशिक्षणातील कामाला पुरस्कार मिळणे ही केवळ संस्थेच्या कामाची पावती नसून भारत व भारताबाहेरील पुढील वाटचालीसाठी प्रेरणाही आहे. भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी करडी पाथमधील कार्यरत प्रत्येक व्यक्ती कठोर प्रयत्न करीत असल्याची प्रतिक्रिया करडी पाथचे सहसंस्थापक सी. पी. विश्वनाथ यांनी व्यक्त केली.
===Photopath===
070621\07nsk_62_07062021_13.jpg
===Caption===
करडी पाथचा उपक्रम सुरू असलेल्या नाशिक प्रकल्पातील शाळेतील विद्यार्थी