सिग्नल तोडण्यातच स्वारस्य़़़

By Admin | Updated: July 10, 2014 01:05 IST2014-07-09T22:02:57+5:302014-07-10T01:05:12+5:30

सिग्नल तोडण्यातच स्वारस्य़़़

Interesting to break the signal | सिग्नल तोडण्यातच स्वारस्य़़़

सिग्नल तोडण्यातच स्वारस्य़़़

 

नाशिक, दि. ९ : शहरातील मुख्य तसेच वर्दळीच्या जवळपास सर्वच चौकांत सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे़ सिग्नलवरील टायमरमुळे नागरिकांच्या पेट्रोलची बचत, तसेच अपघातावर नियंत्रण मिळविणे असा उद्देश यामागे आहे़ काही सुजाण नागरिक सिग्नलवर थांबतात, मात्र बहुतेकांना सिग्नल तोडण्यातच स्वारस्य असल्याचे दिसून येते़ सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांवर केवळ आर्थिक दंडाची कारवाई न करता कायमची अद्दल घडेल अशी कारवाई पोलिसांनी करावी, अशी मागणी नाशिककरांकडून केली जाते आहे़चौकात लावलेली टायमर सिग्नल प्रणाली पाहिल्यास चार रस्त्यांवरील वाहनचालकांसाठी वेगवेगळी वेळ दाखविली जाते़ त्याचप्रमाणे यात लावण्यात आलेले दिवेदेखील वेगवेगळे आहेत़ समोरच्या व उजव्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांसाठी लाल व हिरवा दिवा लावण्यात आला आहे़तर मागाहून येणाऱ्या वाहनचालकांसाठी लाल, पिवळा व हिरवा दिवा लावण्यात आला आहे़हिरव्या दिव्याचा कमीत कमी कालावधी हा १५ सेकंदांचा असून, जास्तीत जास्त वेळ ६० सेकंदांची ठेवण्यात आली आहे़ तर पिवळ्या दिव्याचा कालावधी हा चार ते पाच सेकंदांचा ठेवण्यात आला आहे़ तर लाल दिव्याचा कालावधी हा त्या रस्त्यावर असलेल्या वर्दळीवर आधारित आहे़ यामुळे वेगवेगळ्या चौकांत सिग्नलचे टायमिंग वेगवेगळे आहेत़ बहुतेक सिग्नलवर लाल दिव्याचा कालावधी हा सुमार ९० सेकंदांचा आहे़ तर हिरव्या दिव्याचा कालावधी हा सुमारे २५ सेकंदांचा आहे़ चौकाच्या एका बाजूला या सिग्नलचे आॅपरेटिंग सिस्टीम स्विच लावण्यात आले आहेत़ या ठिकाणी सिग्नल बसविण्याची मागणी
पाथर्डी फ ाटा, गरवारे पॉइंट, कॉलेजरोड, वॉलमार्क चौक, बिगबजार, हॉटेल सिब्बल चौक, जुना गंगापूर नाका, सिडकोतील त्रिमूर्ती चौक, पवननगर, जेलरोड पाण्याची टाकी, गंगापूर रोड, जेहान सर्कल, नांदूरनाका, महेंद्र सर्कल, सातपूर पाइपलाइन चौफु ली, आनंदवल्ली, उपनगर चौकी, के. के.वाघ़महाविद्यालय, विडी कामगारनगर, लेखानगर, साईनाथनगर चौफु ली, इंदिरानगर, डी़ के.नगर, निर्मला कॉन्व्हेन्ट, ड्रिम कॅनल, मखमलाबाद रोड, सह्याद्री हॉस्पिटल, औरंगाबाद नाका, द्वारका पॉइंट, वडाळानाका या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी भीमशक्ती या सामाजिक संघटनेने केली आहे़

Web Title: Interesting to break the signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.