नाशकात गुंतवणुकीसाठी कोरियन उद्योजक इच्छुक

By Admin | Updated: October 21, 2016 02:39 IST2016-10-21T02:36:56+5:302016-10-21T02:39:39+5:30

निमात बैठक : कोरियन मॅन्युफॅक्चर्स व निमा यांच्यात सामंजस्य करारही करणार

Interested Korean entrepreneurs to invest in Nashik | नाशकात गुंतवणुकीसाठी कोरियन उद्योजक इच्छुक

नाशकात गुंतवणुकीसाठी कोरियन उद्योजक इच्छुक

 सातपूर : कोरियन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) यांच्यात सामंजस्य करार करण्याबरोबरच नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याचे आश्वासन कोरियातील को ईन बिजनेस डेव्हलपमेंट सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. के. ली यांनी दिले आहे.
कोरियातील को ईन बिजनेस डेव्हलपमेंट सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. के. ली नाशिक भेटीवर आले असता त्यांनी निमात येऊन उद्योजकांशी सविस्तर चर्चा केली. निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी त्यांचे स्वागत केले. कोरियन उद्योगांनी नाशिकला गुंतवणूक करावी, अशी मागणी निमा पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली आणि नाशिकच्या उद्योग क्षेत्राची सविस्तर माहिती चित्रफितीद्वारे सादर केली, तर कोरियन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) यांच्यात सामंजस्य करार करण्याबरोबरच नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याचे आश्वासन वाय. के. ली यांनी दिले.
यावेळी एमआयडीसीच्या श्रीमती घोडके, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर, निमाचे सरचिटणीस उदय खरोटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, नितीन वागस्कर, माजी अध्यक्ष मनीष कोठारी, संजीव नारंग, निमा आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीचे सहअध्यक्ष मनीष रावळ, हर्षद ब्राह्मणकर आदिंसह उद्योजकांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यानंतर ली यांनी बॉश, राइट टाइट फास्टनर, रिलायबल आॅटोटेक या कारखान्यांबरोबरच नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर आदि ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. (वार्ताहर)

Web Title: Interested Korean entrepreneurs to invest in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.