इतिहासाच्या आवडीमुळे लेखन क्षेत्रात आलो : टकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 00:57 IST2020-01-19T00:10:13+5:302020-01-19T00:57:48+5:30
माणसाला ज्या विषयाची आवड असते तो त्याकडे जास्त आकर्षित होत असतो. लहानपणापासूनच इतिहास व चित्रपटांची आवड होती. तसेच गडकिल्ले फिरण्याची आवड असल्यामुळे इतिहासाविषयी आक र्षण निर्माण झाले. त्यामुळे अनेक पुस्तकांचे वाचन मी करत गेलो. तसेच जुन्या काळातील अनेक चित्रपटांमुळे संगीत व शायरीची आवड लागली. त्यामुळे अनेक विषयांवर लेखन करत गेलो, असे मत लेखक आणि संशोधन गिरीश टकले यांनी व्यक्त केले.

इतिहासाच्या आवडीमुळे लेखन क्षेत्रात आलो : टकले
नाशिक : माणसाला ज्या विषयाची आवड असते तो त्याकडे जास्त आकर्षित होत असतो. लहानपणापासूनच इतिहास व चित्रपटांची आवड होती. तसेच गडकिल्ले फिरण्याची आवड असल्यामुळे इतिहासाविषयी आक र्षण निर्माण झाले. त्यामुळे अनेक पुस्तकांचे वाचन मी करत गेलो. तसेच जुन्या काळातील अनेक चित्रपटांमुळे संगीत व शायरीची आवड लागली. त्यामुळे अनेक विषयांवर लेखन करत गेलो, असे मत लेखक आणि संशोधन गिरीश टकले यांनी व्यक्त केले.
वेध प्रबोधन परिषदेतर्फे ‘वेध कट्टा’ या उपक्रमाची अंतर्गत शनिवारी (दि.१८) टकले यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, भारतावर अनेक प्रकारची आक्रमणे झाल्यामुळे इतिहासाचे पुरावे नष्ट झाले. ब्रिटिश काळापासून खरी इतिहासाची नोंद घेण्यास सुरुवात झाली. भारताच्या बऱ्याच इतिहासापासून आपण वंचित आहोत. भारतावर ग्रीक संस्कृतीचा मोठा प्रभाव जाणवतो. चित्रपट, कविता व शायरीविषयी जुन्या चित्रपटांतील काही प्रसंग व गीतांना त्यांनी उजाळा दिला.