आंतरजिल्हा शिक्षक बदल्यांवरून गोंधळ : दोन परस्पर शासन निर्णय
By Admin | Updated: May 23, 2017 22:08 IST2017-05-23T22:08:00+5:302017-05-23T22:08:00+5:30
आंतरजिल्हा बदल्यांबाबत दोन परस्पर विरोधी शासन निर्णयाने शिक्षण विभागाचा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे.

आंतरजिल्हा शिक्षक बदल्यांवरून गोंधळ : दोन परस्पर शासन निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यांची कार्यवाही होणार असतानाच ३१ डिसेंबर २०१६ पूर्वीच्या परस्पर व आपसी आंतरजिल्हा बदल्यांबाबत दोन परस्पर विरोधी शासन निर्णयाने शिक्षण विभागाचा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. यासंदर्भात तातडीने शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन डझनभर प्राथमिक शिक्षकांच्या नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे बदल्यांचे प्रस्ताव पडून आहेत. या शिक्षकांनी मंगळवारी (दि.२३) जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन शासन निर्णयानुसार ना हरकत दाखला देण्याची मागणी केली. २९ सप्टेंबर २०११ चा शासन निर्णय व १६ डिसेंबर २०१६ चे परिपत्रक याचा आधार या शिक्षकांनी घेतला. मात्र २९ सप्टेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची कार्यवाही करताना संबंधित दोन्ही जिल्हा परिषदेकडून संबंधित शिक्षकांना ना हरकत प्रमाणपत्र दिले पाहिजे. अशाच शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही ३१ डिसेंबरनंतर करण्यात यावी. प्रत्यक्षात १३ डिसेंबरला झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यापुढे कोणत्याही शिक्षकांना आंतरजिल्हा बदल्यांसाठी ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असे आदेश दिले होते.