शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेट जगत यांच्यात सुसंवाद
By Admin | Updated: March 15, 2015 01:02 IST2015-03-15T01:00:34+5:302015-03-15T01:02:43+5:30
शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेट जगत यांच्यात सुसंवाद

शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेट जगत यांच्यात सुसंवाद
नाशिक : विद्यार्थ्यांनी स्पर्धा ही स्वत:शीच करावी, कारण यशाचा मार्ग हा आपल्यालाच शोधावा लागतो, असे प्रतिपादन आरएएससीआय, एनएसडीसी, सीओओचे जेम्स रॅफेल यांनी केले़ मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर अॅड़ बाबूराव गणपत ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय व आयआरएल एंटरप्रायजेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एम्प्लॉइबिलीटी स्कील व इम्पॉयमेंट कॉनक्लेव्ह २०१५च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ रॅफेल पुढे म्हणाले की, शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेट जगत यांच्यात सुसंवाद घडावा तसेच विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी हे कार्यक्रम आवश्यक आहेत़ शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी कंपन्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले़ रॅफेल यांनी विद्यार्थ्यांना ‘हुनर है तो कदम है’ हा यशाचा नवीन मंत्रही दिला़ यानंतर झालेल्या चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांनी माणसातील अंतरगुण वाढविणे, महिलांची प्रगती, ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य व इच्छाशक्ती, स्वत:तील उणिवा व गुणवत्ता याबाबत मार्गदर्शन केले़
या कार्यक्रमासाठी आयआरएलचे दिग्विजय खरोटे यांचे विशेष सहकार्य लाभले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी हिमांशु पंजाबी याने केले़ मान्यवरांचे आभार सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक मुकुंद चौगुले यांनी मानले़, तर कार्यक्रमाची सांगता एनएसडीसी प्रमाणपत्र वितरणाने झाली़ यावेळी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, डीटीईचे सहसंचालक डॉ़ नंदनवार, एचएएलच्या एचआर विभागाचे महाव्यवस्थापक हाफिज, महिंद्र अॅण्ड महिंद्रचे एचआर प्रमुख मेवाडा, एनजीओ प्रतिनिधी सलील पुलेकर, मराठवाडा शिक्षण मंडळाचे संचालक विश्वास पाटील, मेटच्या संचालिका शेफाली भुजबळ, आयआरएलचे उज्ज्वल शंकर यांच्यासह शहरातील महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रतिनिधी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)