सिलिंडर स्फोटाची तीव्रता भीषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:41+5:302021-01-08T04:43:41+5:30
--------- गॅसगळती होऊन झालेल्या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, मी माझ्या घरात पलंगावर बसलेला असताना खाली पडलो. ...

सिलिंडर स्फोटाची तीव्रता भीषण
---------
गॅसगळती होऊन झालेल्या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, मी माझ्या घरात पलंगावर बसलेला असताना खाली पडलो. मोठा आवाज झाल्याने तत्काळ बाहेर धाव घेतली असता, परिसरात धूर आणि शेजारील बंगल्यातून आगीच्या ज्वाळा धुमसत असल्याच्या दिसल्या. त्यामुळे तत्काळ पगार यांच्या बंगल्यात पाठीमागील बाजूने उडी घेत, जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात हलविले.
- राजेंद्र सूर्यवंशी, प्रत्यक्षदर्शी (फोटो आर वर ०४सुर्यवंशी नावाने सेव्ह आहे)
----
परिसरात सकाळच्या सुमारास जणू एखादा बॉम्ब फुटला की काय, असा मोठा आवाज कानी आला आणि या आवाजाने संपूर्ण खुटवडनगर हादरून गेले. मागील अनेक वर्षांपासून या परिसरात आम्ही वास्तव्यास आहोत. मात्र, अशी दुर्घटना पहिल्यांदाच घडली. पगार यांच्या बंगल्याच्या परिसरातील सर्वच घरे हादरून गेली. वेळीच परिसरातील रहिवाशांनी मदतीसाठी धाव घेतल्याने, जखमींना तत्काळ रुग्णालयात पोहोचविणे शक्य झाले.
- सुधाकर जाधव, रहिवासी (फोटो आर वर ०४सुधाकर नावाने सेव्ह आहे)