भक्तीत मनाची एकाग्रता महत्त्वाची
By Admin | Updated: September 10, 2015 00:11 IST2015-09-10T00:10:43+5:302015-09-10T00:11:09+5:30
सुधांशु महाराज : भक्ती सत्संग कार्यक्रमाप्रसंगी दिला गुरूमंत्र

भक्तीत मनाची एकाग्रता महत्त्वाची
नाशिक : भक्तीत मनाच्या एकाग्रतेला महत्त्व आहे. मन एकाग्रतेने केंद्रित केल्यास साधकाचे परमेश्वराशी नाते जुळते. मन सतत भटकत असते. मन ज्यावर टिकते तेच घडत असते. गुरुशी मन जोडल्याने सतत नवीन प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन सुधांशु महाराज यांनी केले.
नाशिक विश्व जागृती मिशनतर्फे चोपडा लॉन्स येथे आयोजित भक्ती सत्संगात ते बोलत होते. गुरुतत्त्व म्हणजे आपण कोण आहोत याचे दर्शन घडविते. आपण स्वत:ला ओळखणे आवश्यक आहे. जीवन सुखकर होण्यासाठी जीवन बदलावे. अमेरिकेतील नासा येथील वैज्ञानिकांनी सूर्याच्या आवाजाचा शोध घेतला. त्यांना त्यात ओमकाराचा ध्वनी मिळाला. त्या आवाजाची क्लीप सत्संग कार्यक्रमात ऐकवण्यात आली. शिवनाम कल्याणकारी आहे. परमेश्वराच्या पवित्र सान्निध्यात सदैव कल्याणच होत असते, असेही ते म्हणाले.
सत्संग कार्यक्रमाच्या प्रारंभी सुधांशु महाराज यांचे सुरत सुनील चोपडा, ब्रह्म भट, रमेश कासार यांनी पुष्पमाला अर्पण करून त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास मिशन मंडळाचे उपाध्यक्ष एस. एस. अग्रवाल, खंडेलवाल, ठकवाणी, ओंकारसिंह राजपूत, अभिमन्यू सूर्यवंशी, एम. एम. सोनवणे, गोविंदराव कोठावदे, सुबोध मिश्रा, राजाराम गवळी, चंदा तातेड, मीना घोडके, दीपक कुंदे, अमोल चव्हाण, पंकज मराठे, दीपक खैरनार, विशाल चौधरी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)