शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमध्ये इंटेग्लिओ प्लेट बनिवण्याचे तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 1:04 PM

देशातील चलनी नोटांच्यामाध्यमातून प्रत्येक नागरिकां पर्यंत पोहचणाऱ्या करन्सी नोट प्रेसने चलनी नोटांची गोपनीयता आणि वैशिष्ट्य अबाधित राहावी यासाठी अाधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली असून नाशिक येथील करेंन्सी नोट प्रेस येथे संगणकाद्वारे अत्याधुनिक इंटेग्लिओ (उत्कीर्ण) प्लेट बनिवण्याच्या तंत्रज्ञानाचे व त्यासाठी आवश्यक  नवीन यंत्राचे उद्घाटन अर्थ मंत्रालयाचे आर्थिक कार्य विभाग सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले

ठळक मुद्देनाशिकच्या नोट प्रेसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आशिया खंडात पहिल्यांदाच इंटेग्लिओ प्रिंटीग प्रणालीचा वापरआर्थिक कार्य विभाग सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक: देशातील चलनी नोटांच्यामाध्यमातून प्रत्येक नागरिकां पर्यंत पोहचणाऱ्या करन्सी नोट प्रेसने चलनी नोटांची गोपनीयता आणि वैशिष्ट्य अबाधित राहावी यासाठी अाधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली असून नाशिक येथील करेंन्सी नोट प्रेस येथे संगणकाद्वारे अत्याधुनिक इंटेग्लिओ (उत्कीर्ण) प्लेट बनिवण्याच्या तंत्रज्ञानाचे व त्यासाठी आवश्यक  नवीन यंत्राचे उद्घाटन अर्थ मंत्रालयाचे आर्थिक कार्य विभाग सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारत प्रतिभूमी मुद्रण तथा मुद्रा निर्माण महामंडळ मर्यादीतच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका तृप्तीपी. घोष, संचालक एस. के. सिन्हा, ए. के. श्रीवास्तव, करन्सी नोट प्रेसचे महाप्रबंधक एस. पी. वर्मा, भारत प्रतिभूमी मुद्रणालयाचे महाप्रबंधक सुधीर साहू आदी अधिकारी उपस्थित होते.याठिकाणी सुरू करण्यात आलेली ही आधुनिक प्रणाली आशिया खंडातील एकमेव प्रणाली आहे. संगणकाद्वारे अत्याधूनिक तंत्रज्ञान वापरून इंटेग्लिओ प्रिंटीगसाठी लागणारी इंटेग्लिओ प्लेट तयार करण्याची ही उच्च प्रणाली आहे. या प्रणालीचा सर्वप्रथम नाशिक येथे वापर करण्यात येत आहे. हीप्रणाली देशाच्या मुद्रण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बँक, नोट मु्द्रणाच्या सुरक्षितेत अधिक भर घालणारी आहे. यावेळी  गर्ग यांनी नोटप्रेसमधील विविध उत्पादन विभागांना भेट दिली. यंत्राची सविस्तर माहिती घेतली. तसेच नोट छपाईच्या यंत्राचे अतिशय बारकाईने निरीक्षण केले व सुरक्षा मानकांचीही माहिती त्यांनी याप्रसंगी जाणून घेतली. करेंसी नोट प्रेस जागतिक स्तरावर एक अत्याधुनिक बँक नोट मुद्रणालय म्हणून नावारूपास येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.करन्सी नोट प्रेस नाशिक हे भारतातील पहिले बँक नोट मुद्रणालय असून, त्याचे उद्घाटन सन १९२८ मध्ये झाले. आजपर्यंत भारताच्या चलना व्यतीरिक्त इतरही अनेक देशांचे चलन छापण्यात आले आहे. 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNashikनाशिकtechnologyतंत्रज्ञान