शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

विमा कंपन्यांना ‘आयुष्यमान’ करण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:43 IST

नाशिक : सरकारने पुरेसे वैद्यकीय व्यावसायिक उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी रुग्णालये अद्ययावत करून तेथे वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणे अपेक्षित आहे, मात्र सरकार त्याऐवजी विमा कंपन्यांना ‘आयुष्यमान’ करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्टÑीय अध्यक्ष डॉ. रवि वानखेडकर यांनी केली.

ठळक मुद्देरवि वानखेडकर : सरकारच्या वैद्यकीय धोरणार टीका

नाशिक : सरकारने पुरेसे वैद्यकीय व्यावसायिक उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी रुग्णालये अद्ययावत करून तेथे वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणे अपेक्षित आहे, मात्र सरकार त्याऐवजी विमा कंपन्यांना ‘आयुष्यमान’ करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्टÑीय अध्यक्ष डॉ. रवि वानखेडकर यांनी केली.आयएमएच्या कृतज्ञता सोहळ्यानिमित्त शालिमार येथील आयएमए कार्यालयात वानखेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डॉ. संजय ओक, आयएम शहराध्यक्ष डॉ. आवेश पलोड, डॉ. नितीन चिताळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ‘आयुष्यमान भारत’ या योजनेतून मिळणारी रक्कम उपचार व जोखमीच्या खर्चाचा विचार करता अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे डॉक्टर-रुग्ण यांच्या नातेसंबंधात तणाव निर्माण होण्याचा धोका संभवतो असे वानखेडकर म्हणाले. सरकारने डॉक्टरांपेक्षा नागरिकांचे आरोग्यहित लक्षात घेऊन वैद्यकीय आयोग विधेयक नामंजूर करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. प्रगत राष्टÑांच्या तुलनेत भारताचे आरोग्यविषयक अंदापत्रकातील तरतूद नगण्य स्वरूपाची असून, हे चिंताजनक आहे. सरकारने सरकारी आरोग्यव्यवस्था अधिकाधिक बळकट करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.टीबीमुक्त भारताचा निर्धारभारत अजूनही ‘क्षयरोगा’ची राजधानी आहे. आपल्या देशात दरवर्षी दोन लाख ७० हजार लोक टीबीने (क्षयरोग) मृत्युमुखी पडतात. देशाचे आरोग्य राजकीय अजेंड्यावर येणे हे स्वागतार्ह आहे; मात्र सरकारने आपली जबाबदारी खासगी क्षेत्रावर ढकलणे योग्य नाही. देशात दरवर्षी २ लाख ७० हजार नागरिकांचा टीबीने मृत्यू होतो, हे अत्यंत धक्कादायक आहे. युनायटेड नेशनकडून याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. जागतिकस्तरावर ‘टीबी हटाव’अभियान युनायटेड नेशनने हाती घेतले आहे. याअंतर्गत २०२५ पर्यंत भारत ‘टीबी’मुक्त करण्याचा निर्धार आयएमएने सरकारसोबत केल्याचे त्यांनी अधोरेखित केले.निवडणुकांमध्ये ‘आरोग्य अजेंडा’मध्य प्रदेश, रांजस्थान, छत्तीसगढ या राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये कर्नाटकप्रमाणे ‘आरोग्य अजेंडा’ ठेवण्यात येणार आहे. जो पक्ष हा अजेंडा मान्य करण्याची हमी देईल, त्याला पाठिंबा आयएमए देणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रयोग कर्नाटक निवडणुकीत यशस्वी ठरल्याचा दावा त्यांनी केला. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्येही आरोग्य अजेंडा मांडला जाईल, असे वानखेडकर म्हणाले.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाMONEYपैसा